मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  chandni chowk bridge : पुण्यातील चांदणी चौकातील पूल वाहतूकीसाठी बंद, लवकरच पूल पाडणार

chandni chowk bridge : पुण्यातील चांदणी चौकातील पूल वाहतूकीसाठी बंद, लवकरच पूल पाडणार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 13, 2022 02:29 PM IST

Pune Chandani Chauk bridge Demolition : पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातील पूल पडण्याच्या कामाला वेग आला आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून तो १८ तारखेला पाडण्यात येणार आहे

चांदणी चौक
चांदणी चौक

पुणे : पुणे बंगलोर मार्गावरील चांदणी चौक येथील पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आज पासून या पूलावारील वाहतूक ही बंद करण्यात आली आहे. या भागातील वाहतूक कोंडी सोडवन्यासाठी नवीन रस्त्यांची निर्मिती या ठिकाणी करण्यात येत असून त्यामुळे हा पूल पाडला जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांदणी चौकातील वाहतूक कोंडीत अडकल्यावर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चांदणी चौक परिसरातील रस्त्याच्या कामाची पाहणी करत वाहतूकीस अडथळा ठरणारा हा पूल पाडण्यात येणार असल्याचे सांगितले होते. या पुलावरील वाहतूक आजपासून बंद करण्यात आल्याने आता प्रवाशांना कोथरुड किंवा सातारा रस्त्यावरुनपाषाण, बावधनकडे जाण्यासाठी दीड किलोमीटचावळसा घालून मुळशीकडून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर उतरावे लागणार आहे. तेथूनच डावीकडे वळून प्रवाशांना बावधन, पाषाणकडे आता जावे लागणार आहे. १८ सप्टेंबर रोजी पहाटे हा पूल पडण्यात येणार आहे. पूल पडण्याची सर्व तयारी करण्यात आली आहे.

दिल्लीतील टिवन टॉवर प्रमाणेच हा पूल पाडण्यात येणार असून ज्या कंपनीने सदर टॉवर क्षणार्थात पाडले. त्याच कंपनीला हा पूल पाडण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे अवघ्या नऊ ते दहा सेंकदात हा पूल जमीनदोस्त होणार आहे. त्याकरिता पूर्वतयारी करण्यासाठी या पूलावरील वाहतूक मंगळवारपासून बंद करण्यात आली आहे. तसेच या परिसरातील नागरिकांना पूल पाडण्यावेळी सर्तकतेचा इशारा ही देण्यात आला आहे. पूल पाडल्यानंतरमहामार्गावर पडणारा ढिगारा तात्काळ हटविण्यासाठी ही काम करण्यात येणार आहे.

पूल पाडण्यापूर्वी याठिकाणच्या वाहतूकीत बदल करण्यात आल्याने प्रवाशांचे पुढील काही दिवस मोठ्या प्रमाणात हाल होणार आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताराच्या दिशेने जात असताना चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा सामना त्यांनाही करावा लागला होता आणि त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी चौकात येऊन त्यांनी या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्या नंतर हा पूल पडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग