मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुणे हादरले! भीमा नदीपात्रात सापडले आणखी तीन मृतदेह, सर्व सात मृतांची ओळख पटली

पुणे हादरले! भीमा नदीपात्रात सापडले आणखी तीन मृतदेह, सर्व सात मृतांची ओळख पटली

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 24, 2023 05:04 PM IST

Dead bodies found in Pune Bhima River : पुण्यातील भीमा नदी पात्रात आणखी सात मृतदेह सापडले असून एकूण मृतदेहांची संख्या आता सातवर गेली आहे.

Bhima River
Bhima River

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमा नदीपात्रात तब्बल सात मृतदेह आढळले आहेत. यात दोन पुरुष, दोन महिलांसह तीन मुलांचा समावेश आहे. हे सातही जण एकाच कुटुंबीतील आहेत. या घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याआधी मागील चार ते पाच दिवसांत इथल्या नदीपात्रात दोन पुरुष व दोन महिलांचे असे चार मृतदेह आढळले होते. १८ जानेवारी रोजी मच्छीमारांना इथं एका महिलेचा मृतदेह आढळला. त्यानंतर एका मागोमाग एक आणखी तीन मृतदेह सापडले. हे मृतदेह एकाच कुटुंबातील असावेत असा अंदाज आल्यानं पोलिसांनी चौकशी सुरू करत मृतदेहांचा शोधही सुरू केला. त्यासाठी एनडीआरएफची मदत घेण्यात आली. एनडीआरएफच्या पथकाला आज आणखी तीन मृतदेह आढळले. हे तीनही मृतदेह मुलांचे आहेत. 

सर्व मृतदेहांची ओळख पटली आहे. मोहन उत्तम पवार (५० वर्षे, रा. खामगांव ता. गेवराई), संगीता मोहन पवार (४५ वर्षे, रा. खामगांव ता. गेवराई ), शामराव पंडित फुलवरे (३२ वर्षे), राणी शामराव फुलवरे (२७ वर्षे), शामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश (वय ७ वर्षे) छोटू फुलवरे (५ वर्षे) आणि कृष्णा (३ वर्षे) अशी त्यांची नावं आहेत. 

ही सामूहिक आत्महत्या आहे की घातपात आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. सर्व मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग