मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Koyta Gang : हातात कोयता घेऊन सोशल मीडियावर ठेवले स्टेट्स; ९ जणांना पोलिसांचा दिला दणका

Pune Koyta Gang : हातात कोयता घेऊन सोशल मीडियावर ठेवले स्टेट्स; ९ जणांना पोलिसांचा दिला दणका

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 24, 2023 07:11 PM IST

Pune koyta gang news : पुण्यात कोयता गॅंगची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलिसांनी या गॅंगविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरवात केली आहे.

Pune crime
Pune crime (HT_PRINT)

पुणे: पुण्यात कोयता गॅंग विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काही तरूणांनी हातात कोयते घेऊन त्याचे फोटो काढत ते सोशल मिडियावर टाकल्या प्रकरणी तब्बल ९ जणांविरोधात गुन्हा शाखेच्या पथक ६ ने कारवाई करत त्यांचावर गुन्हा दाखल केलए आहेत. यातील ३ मुले अल्पवयीन आहेत.

तेजस संजय बधे (वय १९), उदय सिद्धार्थ कांबळे (वय १९), प्रसाद उर्फ बाबू धनंजय सोनवणे (वय १९, तिघेही रा. थेऊर, ता. हवेली), रोहित राजू जाधव (वय २०, रा. लोणी काळभोर, ता. हवेली), संग्राम भगवान थोरात (वय २८, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली), श्याम गुरप्पा जाधव (वय ४३, रा. वानवडी, पुणे), तसेच तीन अल्पवयीन बालकअशी आरोपींची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यात कोयता गॅंगने सध्या धुमाकूळ घातला आहे. अनेक तरुण हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा कोयता गॅंगविरोधात पोलिस आता अॅक्टिव झाले आहेत. घरात शस्त्रे ठेवणे, किंवा ते बाळगने तसेच त्याची विक्री करणाऱ्यांवर गुन्हा शाखेच्या पथकाने आपला फास आवळण्यास सुरुवात केली आहे. 

शहरात विविध ठिकाणी दहशद पसरवत असलेल्या कोयता गँगच्या मोरख्याला ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरील अटक करण्यात आलेल्या आरोपींनी त्याच्या विरोधी गॅंगला आव्हान देण्यासाठी हातात कोयते ठेवून त्याचे फोटो सोशल मिडियावर उपलोड केले. याची कुणकुण पोलिसांना लागताच त्यांनी या गॅंगच्या तब्बल ९ जणांना अटक करत त्यांना पॉलिसी हिसका दाखवला. 

IPL_Entry_Point

विभाग