मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MIM Aurangabad : शिवरायांच्या अपमानाविरोधात एमआयएम रस्त्यावर उतरणार; इम्तियाज जलीलांची घोषणा
MIM MP Imtiyaz Jaleel
MIM MP Imtiyaz Jaleel (HT)

MIM Aurangabad : शिवरायांच्या अपमानाविरोधात एमआयएम रस्त्यावर उतरणार; इम्तियाज जलीलांची घोषणा

06 December 2022, 15:07 ISTAtik Sikandar Shaikh

MIM MP Imtiyaz Jaleel : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आता एमआयएमतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.

Bhagat Singh Koshyari Controversial Statement : औरं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दीक्षांत समारोह सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळं विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच आता एमआयएमनं राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी समर्थकांसह औरंगाबादेतील क्रांती चौकात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

याबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत भाजपच्या नेत्यांकडून सातत्यानं वादग्रस्त वक्तव्यं केली जात आहेत. त्यातच आता राज्यपालपदावर बसलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी आधी सावित्रीबाई फुले आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं त्याचा निषेध करण्यासाठी एमआयएमतर्फे उद्या शहरातील क्रांती चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. आम्ही आजच आंदोलन करणार होतो, परंतु पोलीस प्रशासनानं आमच्या आंदोलनाला परवानगी न दिल्यानं उद्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं खासदार जलील म्हणाले.

राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करा- जलील

शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आदर आणि प्रेम असेल तर त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्यासाठी ठराव पास करायला हवा. आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करू, असं खासदार जलील म्हणाले. राजकीय मतभेद असले तरी शिवरायांचा अपमान करणाऱ्यांविरोधात आम्ही एकत्र येवू, असंही ते म्हणाले.