मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PCMC Fire: पिंपरी-चिंचवडमध्ये अगरबत्तीच्या कंपनीत अग्नितांडव; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

PCMC Fire: पिंपरी-चिंचवडमध्ये अगरबत्तीच्या कंपनीत अग्नितांडव; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 06, 2022 02:36 PM IST

Fire Incident In PCMC : कंपनीत आग लागल्यानंतर लागूनच असलेल्या एका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. याशिवाय अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत.

Fire Incident In Pimpri Chinchwad
Fire Incident In Pimpri Chinchwad (HT)

Fire Incident In Pimpri Chinchwad : पुण्यातील पिंपरी चिंडवडच्या आकुर्डी भागातील रॉयल फ्रेग्णसेस या कंपनीत आग लागल्याची घटना समोर आली आहे. भरदुपारी ही आग लागल्यानं कंपनीत कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं कंपनीबाहेर पळ काढला. या दुर्घटनेत आतापर्यंत कोणत्याही जीवीतहानीचं वृत्त समोर आलेलं नाही. परंतु यात कंपनीच्या मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. याशिवाय पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी परिसरात असलेल्या अगबत्तीच्या कंपनीत आग लागल्याचं समजताच अनेक कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या आवाराबाहेर पळ काढला. त्यानंतर याबाबतची माहिती तात्काळ अग्निशमन विभागाला देण्यात आली. कंपनीला लागूनच असलेल्या एका शाळेतील जवळपास २०० विद्यार्थ्यांना शाळेतून सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. त्यानंतर गेल्या तीन तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अग्निशमन दलाकडून सुरू असल्याची माहिती आहे. परंतु अजूनही आग विझलेली नाही.

सकाळी ११ ते १२ च्या सुमारास ही आग लागलेली असून गेल्या तीन तासांपासून कंपनीतून धुराचे लोट निघत आहे. त्यामुळं आता अगरबत्तीच्या कंपनीत लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आणखी काही गाड्या मागवण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेत कंपनीतील आग विझवण्यात प्रशासनास मदत केली आहे. त्यामुळं आता प्रशासन, पोलीस, स्थानिक आणि अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

IPL_Entry_Point

विभाग