मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mira Bhayandar: पत्नीला लॉजमध्ये पाठवून सेक्स रॅकेट चालवायचा; नराधम आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mira Bhayandar: पत्नीला लॉजमध्ये पाठवून सेक्स रॅकेट चालवायचा; नराधम आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 16, 2023 01:23 PM IST

Sex Racket Case : ग्राहकांची ऑर्डर आल्यानंतर आरोपी आपल्याच पत्नीला लॉजमध्ये पाठवत होता. त्यानंतर आता या घटनेचा भांडाफोड झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Sex Racket Case In Mira Bhayander
Sex Racket Case In Mira Bhayander (HT)

Sex Racket Case In Mira Bhayander : पत्नीला लॉजवर पाठवून सेक्स रॅकेट सुरू असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांच्या लालसेपोटी आरोपीनं आरोपी पतीनं पत्नीकडून सेक्स रॅकेट चालवल्याची घटना समोर आल्यानंतर आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्यामुळं ठाण्यासह मीरा भाईंदर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपी पतीला त्याच्या दोन मित्रांनीही मदत केल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मीरा भाईंदरमधील एका लॉजवर सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती खबऱ्यांमार्फत पोलिसांकडून मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एका कर्मचाऱ्याला ग्राहक बनवून संबंधित लॉजमध्ये पाठवलं. त्यावेळी लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांच्या टीमनं लॉजवर छापा मारून दोन महिलांची सुटका करत त्यांना सुधारगृहात पाठवलं आहे. या घटनेमुळं शहरात खळबळ उडाली आहे. चौकशी केल्यानंतर पीडित महिलांनी त्यांच्या पतीकडूनच हे सेक्स रॅकेट सुरू असल्याचं सांगितलं. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात महिलेच्या आरोपी पतीला अटक केली असून त्यांच्या दोन साथीदारांचा शोध सुरू केला आहे.

नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेनं ठाण्यात खळबळ...

ग्राहकांनी जास्त पैसे दिल्यानंतर आरोपी आपल्याच पत्नीला लॉजवर पाठवत होता. त्यामुळं पीडित पत्नी नाराज होती. परंतु आता या घटनेची माहिती समजताच पोलिसांना प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. काही दिवसांपूर्वीच ठाण्यासह पुणे शहरात सेक्स रॅकेट सुरू असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता मीरा भाईंदरमध्येही सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं आहे.

IPL_Entry_Point