मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PCMC News : कामावर का गेला नाही विचारल्यानं तरुणाकडून आईची हत्या; संतापजनक घटनेनं पिंपरीत खळबळ

PCMC News : कामावर का गेला नाही विचारल्यानं तरुणाकडून आईची हत्या; संतापजनक घटनेनं पिंपरीत खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 23, 2023 08:16 PM IST

Pimpri Crime News Marathi : कामावर का गेला नाही, अशी विचारणा केल्यामुळं संतापलेल्या तरुणानं जन्मदात्या आईचीच हत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

Pimpri Chinchwad Crime News Marathi
Pimpri Chinchwad Crime News Marathi (HT_PRINT)

Pimpri Chinchwad Crime News Marathi : पालिकेत काम करत असलेल्या मुलाला कामावर का गेला नाही, अशी विचारणा केल्यावर तरुणानं आपल्याच आईच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पिंपरीतील निराधारनगर परिसरात ही घटना घडली असून प्रयागबाई अशोक शिंदे असं मृत महिलेचं नाव आहे. त्यानंतर आता पिंपरी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच पिंपरीत एका व्यापाऱ्याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता मुलानं आपल्याच आईची हत्या केल्यामुळं शहरातील कायदा व सुवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीच्या निराधारनगरमध्ये राहणाऱ्या प्रयागबाई शिंदे यांचा मुलगा विश्वास हा पिंपरी-चिंचवड महापालिकेत कचरा उचलणाऱ्या गाडीवर काम करतो. विश्वासला दारुचं व्यसन असल्यानं त्याचे अनेक दिवसांपासून आईसोबत कडाक्याचे भांडण होत होते. विश्वास सतत कामावर न जात असल्यामुळं प्रयागबाई यांनी विश्वासला त्याचा जाब विचारत कामावर जाण्यास सांगितलं. त्यामुळं संतापलेल्या विश्वासनं सिमेंट गट्टू आई प्रयागबाई यांच्या डोक्यात फेकून मारला. त्यामुळं प्रयागबाई या जागेवरच कोसळल्या. डोक्याला मार लागल्यामुळं त्याच्या मेंदूत रक्तस्राव झाला. परिणामी त्यांची श्वसन क्रिया बंद पडल्यानं त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

निराधारनगरमध्ये महिलेची हत्या झाल्याची घटना समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रयागबाई यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली. आरोपी विश्वासवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेच्या काही तासांतच त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वसंत डोंब हे करीत आहेत.

IPL_Entry_Point