Railway Accident : लोकल ट्रेनच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू, आसनगाव स्टेशनवरील घटना-elderly woman died after being hit by local train in asangaon railway station mumbai ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Railway Accident : लोकल ट्रेनच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू, आसनगाव स्टेशनवरील घटना

Railway Accident : लोकल ट्रेनच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू, आसनगाव स्टेशनवरील घटना

Mar 23, 2023 05:29 PM IST

Mumbai Local Train Accident : मुंबईच्या आसनगाव रेल्वे स्टेशनवर लोकलच्या धडकेत एका महिलेला दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Local Train Accident Asangaon Mumbai
Local Train Accident Asangaon Mumbai (HT)

Local Train Accident Asangaon Mumbai : लोकल रेल्वेनं धडक दिल्यामुळं एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रेल्वेचं रुळ ओलांडत असताना हा अपघात झाला असून कसाऱ्याहून आलेल्या रेल्वेनं महिलेला धडक दिल्याची माहिती आहे. सीताबाई पांढरे असं मृत महिलेचं नाव असून या अपघातामुळं आसनगाव रेल्वे स्थानकाहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी रेल्वेसेवा खोळंबली आहे. काही दिवसांपूर्वीच लोकलच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता लोकलच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्यामुळं मुंबईत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आसनगाव रेल्वे स्थानकातून बाहेर निघण्यासाठी सीतापबाई पांढरे या निघाल्या होत्या. फ्लायओव्हर नसल्यानं त्यांनी रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला असता कसाऱ्याहून येणाऱ्या लोकल रेल्वेनं त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळं त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच आसनगाव स्थानकावरील प्रवासी आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय स्थानिक पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. लोकलच्या अपघातामुळं आसनगावकडून सीएसटीच्या दिशेनं जाणारी रेल्वेची लोकल वाहतूक खोळंबली आहे.

आसनगाव रेल्वे स्थानकावरील फ्लायओव्हर २०१८ साली तोडण्यात आला होता. अद्याप त्याचं काम पूर्ण करण्यात आलेलं नाही. फ्लायओव्हर नसल्यामुळंच वृद्ध महिलेला नाहक जीव गमवावा लागल्याचं प्रवाशांनी सांगितलं आहे. त्यामुळं आता या घटनेनंतर आसनगाव रेल्वे स्थानकावर तातडीनं फ्लायओव्हर बसवण्याची मागणी केली जात आहे. आसनगावहून सीएसटीच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटं उशिरानं धावत आहेत. त्यामुळं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.