Kalamb Rape: महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील घटनेने यात आणखी भर घातली. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीवर गावातील चार मुलांनी वेगवेगळ्या वेळी अत्याचार केला. गेल्या सहा महिन्यापासून हा प्रकार सुरु होता. मात्र, पीडिताला कोरड्या ओकाऱ्या होत असल्याने घरच्यांनी तिला दवाखान्यात नेले. त्यावेळी पीडिता दीड महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. हे ऐकून पीडिताच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील चौकशीला सुरुवात केली.
पीडित मुलगी इयत्ता सातवीतील विद्यार्थी आहे. तिला कोरड्या ओकाऱ्या सुरु झाल्याने दवाखान्यात नेण्यात आले. त्यावेळी ती दीड महिन्याची गर्भवती असल्याचे समजले. पीडिताच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी पीडिताने तिच्यासोबत घडलेला प्रकार संपूर्ण प्रकार सांगितला. सहा महिन्यापूर्वी पीडिता नेहमीप्रमाणे आजीचा डबा घेऊन शेताकडे जात असताना एका १६ वर्षीय मुलाने तिला ज्वारीच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर काही दिवसांनी एका २० वर्षीय तरुणाने तिच्यावर अत्याचार केले. हा प्रकार थांबलाच नाही. यानंतर गावातील आणखी दोन जणांनी तिच्यावर अत्याचार केले. या नराधमांनी पीडितावर वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या स्थळावर तिच्यावर बलात्कार केला.
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन शिराझोन पोलिसांनी चार जणांविरोधात कलम ३७६, (२) (आय), ३७६ (२) (एन), ३७६ (२) (जे), ५०६ सह पोक्सो कायद्यांर्गत कलम ४, ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपींमध्ये एक जण अल्पवयीन आहे.
संबंधित बातम्या