मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Old pension scheme : मिशन जुनी पेन्शन संपलं.. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

Old pension scheme : मिशन जुनी पेन्शन संपलं.. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 20, 2023 05:04 PM IST

GovernmentEmployees StrikeOff : मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटला आहे. उद्यापासून कामावर हजर होण्याचे आवाहन सरकारी कर्मचारी संप समन्वय समितीने केले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

मुंबई -जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी गेल्या जवळपास सात दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधानभवनात झालेल्या बैठकीनंतर या संपावर तोडगा काढण्यात आला. सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगून संप मागे घेत असल्याची घोषणा सरकारी कर्मचारी संप समन्वय समितीने जाहीर केले.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या मंगळवारपासून संप पुकारला होता. यामध्ये महापालिकेतील कर्मचारीही सामील झाले होते. आता हा संप मागे घेण्यात आला असून कर्मचारी उद्यापासून कामावर हजर राहणार आहेत. आंदोलनकर्त्यांनी प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं संप समन्वय समितीने सांगितले आहे. त्यामुळे हा संप मागे घेतल्याचे समितीने म्हटले आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांनीआज घोषणा केली होती की, २८मार्चपासूनतेसंपात प्रत्यक्ष सामीलहोणार आहेत, तसेच ३ एप्रिलपासून संपूर्ण कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनेला विधान भवनात बैठकीसाठी बोलावलं होतं. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. जुनी पेन्शन योजना लागू होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे.

 

राज्यातील अवकाळीमुळे जी कामं प्रलंबित आहेत ती पूर्ण करण्यासाठी प्राधान्यानं काम करणार असल्याचं समन्वय समितीनेम्हटले आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर हजर रहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

IPL_Entry_Point