मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Antilia Bomb Scare : अँटिलिया, मनसुख हिरेन प्रकरणाचा एनआयएनं सखोल तपास केला नाही; उच्च न्यायालयाने फटकारले

Antilia Bomb Scare : अँटिलिया, मनसुख हिरेन प्रकरणाचा एनआयएनं सखोल तपास केला नाही; उच्च न्यायालयाने फटकारले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 24, 2023 08:29 AM IST

Mansukh Hiren Case : अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सखोल तपास केला नसल्याचे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.

Bombay High Court
Bombay High Court

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया येथे जिलेटीनच्या कांड्या आढळल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करत असतांना काही दिवसांनी मानसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि सचिन वझे यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आला होता. हा तपास एनआयए देखील करत होते. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने, या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एनआयएला फटकारले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि आरएन लड्डा यांच्या खंडपीठाने या प्रकरणी ताशेरे ओढत म्हटले आहे की, २४ /२५ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबईत एका बड्या उद्योजकाच्या घराजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. याप्रकरणी एनआयएने जो तपास केला आहे तो समाधानकारक नाही. हा मोठा कट असून तो नियोजनाशिवाय शक्य नाही. यात अनेक जण गुंतले असल्याची शक्यता आहे.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे सोबत कोण होत. स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या कुणी ठेवल्या. या कटामागे कोण आहे? या प्रकरणी एनआयएने तपास केला असूनही या प्रकरणी एनआयएचे अधिकारी मौन बाळगून आहेत, असे खंडपीठाने म्हटले आहे. हा मोठा कट सचिन वाझे एकट्याने रचणे शक्य नाही. त्याला कुणाची साथ आहे? या चा सखोल तपास एनआयने केला नाही असे देखील कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान, अँटिलिया प्रकरण आणि व्यापारी मनसुख हिरण यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जामीन देण्यास उच्च न्यायालयानं सोमवारी फेटाळला आहे.

IPL_Entry_Point

विभाग