Vaibhav Kadam : जितेंद्र आव्हाडांच्या माजी बॉडीगार्डची आत्महत्या; धक्कादायक घटनेनं ठाण्यात खळबळ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vaibhav Kadam : जितेंद्र आव्हाडांच्या माजी बॉडीगार्डची आत्महत्या; धक्कादायक घटनेनं ठाण्यात खळबळ

Vaibhav Kadam : जितेंद्र आव्हाडांच्या माजी बॉडीगार्डची आत्महत्या; धक्कादायक घटनेनं ठाण्यात खळबळ

Mar 29, 2023 04:00 PM IST

Vaibhav Kadam Suicide : अनंत करमुसे यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात वैभव कदम यांना अटक करण्यात आली होती.

Vaibhav Kadam Suicide In Thane
Vaibhav Kadam Suicide In Thane (HT)

Vaibhav Kadam Suicide In Thane : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक आणि पोलीस हवालदार वैभव कदम यांनी आज ठाण्यात रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची थरारक घटना समोर आली आहे. निळजे ते तळोजा या रेल्वे मार्गा दरम्यान त्यांनी आत्महत्या केली असून त्यानंतर आता पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे राज्याचे गृहनिर्माण मंत्री असताना वैभव कदम हे त्यांचं अंगरक्षक होते. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी वैभव कदम यांनी आरोपी अनंत करमुसे यांना मारहाण केली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली होती.

वैभव कदम हे आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास निळजे ते तळोजा या मार्गावरील रेल्वेगाडीखाली उडी मारत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु घटनास्थळावरून पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याची माहिती आहे. ठाण्यातील लोहमार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. वैभव कदम हे मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांनी अचानक आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यामुळं ठाण्यासह मुंबईत खळबळ उडाली आहे. त्यामुळं आता या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वैभव कदमांची आत्महत्या नाही तर हत्या- भाजपा

वैभव कदम हे एका हायप्रोफाईल प्रकरणात मुख्य साक्षीदार होते. त्या प्रकरणावर ते खुलासा करणार होते, परंतु त्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूची घटना समोर आली. त्यामुळं वैभव कदमांची आत्महत्या नसून हत्या झाली असल्याचा दावा भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर