मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar On Dasara Melava: यंदाचा दसरा मेळावा शिवसेनेचा की शिंदे गटाचा? अजित पवार म्हणाले..

Ajit Pawar On Dasara Melava: यंदाचा दसरा मेळावा शिवसेनेचा की शिंदे गटाचा? अजित पवार म्हणाले..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 09, 2022 05:46 PM IST

शिंदे गट आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे या दोघांकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यातच आताअजित पवारयांनी या मुद्यावर भाष्य करत, बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाची आठवण करून दिली आहे.

दसरा मेळावा शिवसेनेचा की शिंदे गटाचा?
दसरा मेळावा शिवसेनेचा की शिंदे गटाचा?

Ajit Pawar On Dasara Melava: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर खरी शिवसेना कुणाची व पक्षचिन्हावर कुणाचा अधिकार?असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वात जास्त आमदार व खासदार आपल्या बाजुने असल्याने खरी शिवसेना आमचीच असा दावा एकनाथ शिंदे गटाने केला आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असताना दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद सुरू आहे. हा वादही न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. मात्र या वादावर राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

मुंबईतील शिवाजी पार्कवर नेमका कोणाचा दसरा मेळावा (Dasara Melava) होणार, यावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. शिंदे गट आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे या दोघांकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यातच आताअजित पवारयांनी या मुद्यावर भाष्य करत, बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाची आठवण करून दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नेमका कोणाचा हा वादच निरर्थक आहे. दोन्ही गटांनी आपआपल्या परीने दसरा मेळावा घ्यावा. हा मान बाळासाहेबांच्याच शिवसेनेचा आहे. आता येथून पुढे उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे नेतृत्व करतील, असे बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवरूनच सांगितले होते. हे सर्व जनतेने ऐकले आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मान हा शिवसेनेचाच आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

बारामतीकर त्याचा विचार करतील -पवार

भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. महाराष्ट्रातील १६ मतदारसंघाची जबाबदारी भाजपने केंद्रीय मंत्र्यांकडे सोपवून मिशन महाराष्ट्र सुरू केले आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. भाजपच्या नेत्यांकडून शरद पवार व कुटुंबावर निशाणा साधला जात आहे.याला राष्ट्रवादी नेत्यांकडूनही जशास तसे उत्तर दिले जात आहे. यावर अजित पवार यांनी म्हटले आहे की, गेल्या ५५ वर्षांत असे कितीतरी जण आले आणि कितीतरी जण गेले. खूप लाटा आलेल्या आणि गेलेल्या बारामतीकरांनी पाहिल्या आहेत. बारामतीकरांना खूप चांगले माहिती आहे की, कुणाचे बटण कशा पद्धतीने दाबायचे. ते त्या निवडणुकीत त्यांचे काम चोखपणे बजावतील. याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, असे सांगत बारामतीमध्ये माझे काम बोलते. त्यामुळे तुम्ही बारामतीची काळजी करू नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारे कुणी असेल, तर बारामतीकर त्याचा विचार करतील, असे अजित पवार म्हणाले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या