मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava: लांबलेलं भाषण अन् राष्ट्रवादीवरील टीकेवरून मुख्यमंत्री शिंदेंना अजित पवारांचा टोला

Dasara Melava: लांबलेलं भाषण अन् राष्ट्रवादीवरील टीकेवरून मुख्यमंत्री शिंदेंना अजित पवारांचा टोला

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 06, 2022 10:55 AM IST

Dasara Melava: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या दोन्ही दसरा मेळाव्यांवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (HT_PRINT)

Ajit Pawar On CM Shinde Speech: मुंबईत काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या दोन्ही दसरा मेळाव्यांवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. अजित पवार म्हणाले की, दसरा मेळाव्यात झालेली मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही भाषणे मी ऐकली. पण काहींची भाषणं नको तितकी लांबली. अजित पवार यांनी नाव न घेता यातून मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावला. ते पुढे म्हणाले की, आता शिवसैनिकांनी निर्णय घ्यायला हवा. आपली पुढची भूमिका काय असेल, कोणाच्या पाठीशी उभा रहायचं. कोणाची मूळ शिवसेना याचाही विचार करावा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड तास भाषण केलं. त्यांच्या या भाषणावरून आता टीकाही होत आहे. अजित पवार म्हणाले की, काहींची भाषणे नको तितकी लांबली. आता कोणाची लांबली त्याचा विचार तुम्ही करा. तसंच ही राजकीय वक्तव्ये होती. शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेली वक्तव्ये गांभीर्याने घेऊ नका.

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून १० कोटी रुपये खर्च करून बसची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावरूहन अजित पवार यांनी थेट टीका केली. अजित पवार म्हणाले की, मेळाव्यासाठी १० कोटी खर्चून बसची व्यवस्था केली, पम सर्वसामान्य लोकांना एसटी मिलाली नाही. दोन्हीकडे मेळाव्यासाठी गर्दी होती. ती कशी होती, काय होती? झेंडा शिवसेनेचा पण अजेंदा राष्ट्रवादीचा असल्याची टीका शिंदे गटाने केली पण मंत्रिमंडळात असताना एकनाथ शिंदे कधीच बोलले नाहीत.

एकनाथ शिंदे हे माझ्या उजव्या बाजूला बसायचे. आम्हाला अनेक वर्षांचा विविध पक्षांना सोबत घेऊन सरकार चालवायचा अनुभव आहे. १९९९, २००४, २००९ आणि २०१९ मध्येही अनेक पक्षांचं सरकार चालवलं आहे. जे निर्णय घेतले ते सर्वांनी मिळून घेतल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या