मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar: लग्नाच्या मांडवातच अजितदादांनी मनसेच्या नेत्याला दिली पक्षप्रवेशाची ऑफर

Ajit Pawar: लग्नाच्या मांडवातच अजितदादांनी मनसेच्या नेत्याला दिली पक्षप्रवेशाची ऑफर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 06, 2022 07:46 PM IST

Ajit Pawar: पुण्यातील मनसेचे प्रमुख नेते वसंत मोरे सध्या नाराज आहेत. त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याने पक्षाला राम राम ठोकल्यावर वसंत मोरे हे देखील पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. याच वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.

अजित पवार - वसंत मोरे
अजित पवार - वसंत मोरे

पुणे : पुण्यात मनसे नेते वसंत मोरे यांच्या एका कार्यकर्त्याने पक्षाला जय महाराष्ट्र म्हटले आहे. यामुळे आता मोरे देखील मनसेला राम राम ठोकतील अशी चर्चा आहे. त्यात काल एका लग्नसोहळ्यात अजित पवार आणि वसंत मोरे यांची भेट झाली. अजित पवार यांनी त्यांच्या स्टाइलमध्ये मोरे यांना राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत.

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि वसंत मोरे काल पुण्यात एका लग्न समारंभात भेटले होते. यावेळी पवार यांनी त्यांच्या शैलीत मोरे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. 'तात्या कधी येता... वाट पाहतोय,' असे पवार मोरे यांना म्हणाले आहेत. अजित पवारांच्या वक्तव्याला वसंत मोरे यांनीही दुजोरा दिला आहे. वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचा चेहेरा आहेत. मात्र, काही दिवसांपासून ते नाराज आहेत. राज ठाकरे यांच्या भोग्याच्या मुद्यावरून मोरे हे नाराज होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर देखील नाराजी व्यक्त केली होती. पक्षातील पदाधिकारी आपल्याला विश्वासात घेत नाहीत.

बैठकांना बोलावत नाहीत. मेळाव्याला, सभांना गेलं तरी भाषण करण्याची संधी देत नाहीत, असा आरोप वसंत मोरे यांनी केला होता. या घटनेनंतर मोरे यांचे समर्थक असलेले मनसे माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची हाकालपट्टी करण्यात आली. यानंतर त्यांनी ४०० कार्यकर्त्यांसह राजीनामा दिला. दरम्यान, वसंत मोरे हे देखील नाराज असल्याने ते देखील पक्ष सोडतील अशी चर्चा होती. दरम्यान अजित पवार यांनी त्यांना ऑफरदिल्यानंतर आता पुण्याच्या राजकीय वर्तुळातील चर्चा सुरू झाल्या आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग