ठाणे: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांना पाडण्यासाठी खुद्द अजित पवार यांनी फिल्डिंग लावल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. यासाठी अनेक फोन पवार यांनी केल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. म्हस्के यांच्या या आरोपामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
एमसीएची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली. या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी रोहित पवार उभे होते. त्यांच्याविरोधात अभिषेक बोके हे निवडणुकीच्या मैदानात होते. या निवडणुकीत रोहित पवार यांनी क्लब वर्गातून जास्तीत जास्त मते मिळवली. मात्र, या निवडणुकीत रोहित पवार यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी फिल्डिंग लावल्याचे नरेश म्हस्के म्हणाले. म्हस्के म्हणाले, अजित पवार साहेब आधी आपलं बघा, नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा. रोहित पवारांना पाडण्यासाठी तुम्ही कोणाकोणाला फोन केले आणि निरोप दिले ते सांगा. आधी याची कल्पना लोकांना द्या, नंतर आमच्यावर टीका करा.
नरेश म्हस्के यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. या आरोपा मुळे नव्या वादाला तोंड फुटणार आहे. या आरोपांना राष्ट्रवादी काय उत्तर देणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहित पवार देखील यावर काय बोलतील या कडे देखील सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसएशनची निवडणूक जानेवारी महिन्यात घेण्यात आली होती. यात रॉईत पवार यांनी बाजी मारत अध्यक्षपद मिळवले होते. त्यांना २४ मतदारांपैकी पवार यांना २२, तर सुनील मुथा यांना २१ मते पडली होती. तर शरद पवारांचे दुसरे नातू अभिषेक बोके यांना तीन, तर शंतनू सुगवेकर यांना दोन मते मिळाली होती.