1 april : उद्यापासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात; काय स्वस्त होणार, काय महाग? वाचा संपूर्ण यादी
what will cost more and become cheaper from 1 April : नवं आर्थिक वर्ष उद्या, १ एप्रिलपासून सुरू होत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांप्रमाणे उद्यापासून काही वस्तू महाग व काही वस्तू स्वस्त होणार आहेत.
what will cost more and become cheaper from 1 April : केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध करांची अंमलबजावणी उद्या, १ एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यामुळं अनेक वस्तू महागणार असून त्याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
नवे आर्थिक वर्ष उद्यापासून सुरू होत आहे. आर्थिक बाबतीत अनेक बदल उद्यापासून होत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक वस्तूंवरचं आयात शुल्क वाढवण्यात आलं आहे. त्याचा परिणाम संबंधित वस्तूंच्या उत्पादन खर्चावर होणार असून साहजिकच या वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत. तर, ज्या वस्तूंच्या आयातीवरील शुल्क कमी करण्यात आलं आहे, त्या वस्तू स्वस्त होणार आहेत.
या वस्तू होणार महाग
सिगारेट, स्वयंपाकघरातील चिमणी, कपडे, आयात केलेल्या सायकली आणि खेळणी, आयात कार आणि इलेक्ट्रिक वाहने, एक्स-रे मशीन, आयात केलेल्या चांदीच्या वस्तू, कृत्रिम दागिने, कंपाऊंड रबर, प्रक्रिया न केलेली चांदी
या वस्तू होणार स्वस्त
एलईडी टीव्ही, मोबाइल फोन, खेळणी, मोबाइल आणि कॅमेऱ्याच्या लेन्स, इलेक्ट्रिक कार, हिऱ्यांचे दागिने, फिश ऑईल, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणार्या लिथियम आयर्न सेल, यंत्रसामग्री, बायोगॅस संबंधित वस्तू
UPI व्यवहार महागणार
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI ला व्यापारी व्यवहारांवर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) शुल्क लागू करण्यास सांगितलं आहे. त्याच्या परिपत्रकानुसार, २ हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाईल. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, प्रीपेड पेमेंट साधनांद्वारे (पीपीआय) UPI पेमेंटवर १.१ टक्के इंटरचेंज शुल्क आकारले जाईल.
वाहनांच्या किमतीही वाढणार
टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प आणि मारुती यांनी पुढील महिन्यापासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. तसंच, उद्यापासून नवीन सेडान कार, होंडा अमेझ कार देखील खूप महाग होणार आहे.