मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar: 'एखाद्या शहाण्या माणसाबद्दल प्रश्न विचारा ना; शरद पवारांचा रोख कुणाकडे?

Sharad Pawar: 'एखाद्या शहाण्या माणसाबद्दल प्रश्न विचारा ना; शरद पवारांचा रोख कुणाकडे?

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 06, 2023 05:07 PM IST

Sharad Pawar on Chandrakatn patil : कसबा पेठ मतदार संघातील नवनियुक्त आमदार रविंद्र धंगेकर यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांना चंद्रकात पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी मोजक्या शब्दात उत्तर देत पाटील यांचावर टीका केली.

Sharad Pawar
Sharad Pawar

पुणे : कसबा पेठ येथील विजयानंतर आज नवनियुक्त आमदार रविंद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांनी त्यांना चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी मोजक्या शब्दांत उत्तर देत त्यांचावर टीका केली. मला शहाण्या माणसाबद्दल विचारा असे म्हणत मोजक्या शब्दांत त्यांनी त्यांचा पाणउतारा केला. या सोबतच पवार यांनी कसाब पेठ निवडणुकीवर देखील भाष्य केले. “रवींद्र धंगेकरांना यश मिळेल याची मला स्वतःला खात्री नव्हती,'' या निवडणुकीचे श्रेय हे त्यांनाच विचारा असे देखील पवार म्हणाले.

शरद पवार यांना पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांच्या बद्दल प्रश्न विचारला. यावेळी पवार म्हणाले 'शहाण्या लोकांबद्दल प्रश्न विचारा'. या सोबतच महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत पवार म्हणाले, कसब्यात महाविकास आघाडी एकदिलाने लढल्यामुळे विजय मिळाला. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहावी, तिन्ही पक्षांनी एकत्रपणे काम करावे, हा प्रयत्न राहणार आहे. महाराष्ट्रातील जनतेला बदल हवाय, हे मी राज्यात गेल्या काही दिवसांपासून फिरत असल्याने जाणवते. ज्या ठिकाणी मी जातो तेथील लोक आम्हाला बदल हवाय. तुम्ही सगळ्यांनी एकत्र या, असे म्हणत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

'मला कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या विजयाची खात्री नव्हती. गिरीश बापट यांच्या अनेक वर्षांच्या प्रभावामुळे कसबा हा भाजपचा बालेकिल्ला झाला होता. नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ या भागातील मतदार भाजपशी वर्षानुवर्षे बांधले गेले होते. मात्र, रवींद्र धंगेकर यांना सर्व स्तरातून पाठिंबा असल्यामुळे अगदी पेठांच्या परिसरातूनही त्यांना मतं मिळाली. रवींद्र धंगेकर यांच्या कामाची दखल मतदारांनी घेतली होती. यामुळे कसब्यात त्यांचा विजय झाला, असे शरद पवार यांनी म्हटले.

IPL_Entry_Point

विभाग