मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Bypoll: कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीची जबाबदारी अजित पवारांवर; पाहा काय म्हणाले शरद पवार?

Pune Bypoll: कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीची जबाबदारी अजित पवारांवर; पाहा काय म्हणाले शरद पवार?

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 23, 2023 12:05 PM IST

Sharad Pawar on Pune Bypoll: पुण्यात पिंपरी-चिंचवड आणि कसबा मतदार संघाच्या पोट निवडणूका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसदेखील उमेदवार उभे करणार आहे. दरम्यान, या निवडणुकीबाबत शरद पवार यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.

 Pune Bypoll
Pune Bypoll

Sharad Pawar on Pune Bypoll : पुण्यात कसबा आणि पिंपरी-चिंचवड मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला रिंगणार उतरवणार ? महाविकास आघाडी या निवडणुकीत एकत्रित लढणार का? हे प्रश्न असतांना या निवडणुकीच्या जबाबदारीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. 'कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीविषयी तुम्ही अजित पवार यांना विचारा. मला राजकीय प्रश्न विचारू नका', असे मध्यमांशी बोलताना पवार यांनी  सांगितले.

शरद पवार हे रविवारी बारामती येथील कृषी प्रदर्शनात आले होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी वरील भाष्य केले. त्यांच्या या व्यक्तव्यामुळे या दोन्ही पोटनिवडणुकीची जबाबदारी ही अजित पवार यांच्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवड आणि कसबा या दोन पोटनिवडणुकांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर, २ मार्चला निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीवरून पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत. शरद पवार यांच्या या विधानामुळे या निवडणुकीत अजित पवार ही किंग मेकरची भूमिका बजावतात का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

बारामती येथील कृषी प्रदर्शनात अनेक नेत्यांनी हजेरी लावली आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. यामुळे त्यांच्यात आणि पवार कुटुंबियात दिलजमाई झाली असल्याची चर्चा यावेळी होती. सत्तार यांनी देखील यावेळी पवार कुटुंबियांचे कौतुक केलए होते. या बद्दल देखील पवार यांना विचारले असता त्यांनी याला मी फार काही महत्त्व देत नाही, असे स्पष्ट केले.

 

IPL_Entry_Point

विभाग