मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kasba bypoll : भाजपनं तपासली 'या' तीन नेत्यांची लोकप्रियता; कसबा मतदारसंघात केला गुपचूप सर्व्हे

Kasba bypoll : भाजपनं तपासली 'या' तीन नेत्यांची लोकप्रियता; कसबा मतदारसंघात केला गुपचूप सर्व्हे

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 20, 2023 09:59 AM IST

Pune BJP survey for Kasba bypoll : पुण्यात आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या मतदार संघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार या बाबत सध्या राजकीय घडामोडी सुरू असतांना, भाजपने या मतदार संघात गुप्त सर्वे केल्याचे पुढे आले आहे.

Kasba bypolle
Kasba bypolle

Pune BJP survey in Kasba : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यायची यावरुन सध्या राजकारण सुरू आहे. उमेदवार टिळक घराण्यातील असावा अशी भूमिका काल शैलेश टिळक यांनी मांडली होती. तर विरोधकांनीही या मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. भाजपने मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसा आधी या मतदार संघात तिघांच्या लोकप्रियतेबाबत गुपचुप सर्वेक्षण केले असल्याचे पुढे आले आहे. याचा अहवाल प्रदेश शाखेला देण्यात आल्याची माहिती आहे. हे तिघेही स्थानिक नेते असून एक नेता लोकप्रियतेत इतर दोघांच्या तुलनेत पुढे असल्याची माहिती आहे.

आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. मात्र, ही निवडणुक जाहीर होण्याची कुणकुण लागताच भाजपने उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी हा सर्वे गुपचुप घेतला आहे. या बाबत आठ ते दहा दिवसांपासून तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. या सर्वेक्षणात स्थानिक नेत्यांची असलेली लोकप्रियता, त्यांच्या बद्दल असलेला विश्वासय बाबी तपासण्यात आल्याचे बोलले जात आहे. हे तिन्ही स्थानिक नेते हे कसबा विधानसभा मतदारसंघातील असून, महापालिकेचे माजी पदाधिकारी असल्याची माहिती मिळत आहे.

कसबा निवडूक लढवण्यासाठी कॉँग्रेसने तयारी केली आहे. हा मतदार संघ कॉँग्रेसकडे आहे. असे असले तरी भाजपचा हा पारंपरिक मतदार संघ राहिला आहे. त्यामुळे येथील निवडणूक ही बिनविरोध व्हावी या साठी भाजप नेते प्रयत्नशील आहेत. असे झाल्यास टिळक कुटुंबातील सदस्याला विधानसभेची उमेदवारी मिळू शकते. दरम्यान, काल शैलश टिळक यांनी देखील उमेदवारी ही टिळक कुटुंबाला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान ही निवडणूक बिनविरोध न झाल्यास काय करायचे या बाबतही या सर्वेवरून चर्चा झाली असल्याचे समजते.

कॉँग्रेस ही निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. त्यामुळे उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. या संदर्भात महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याचे कळत आहे. कॉँग्रेसच्या प्रदेश पातळीवर एकमत झाल्यावर या बाबत निर्णय घेतला जाणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग