मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar Eye Surgery : शरद पवार रुग्णालयात अ‍ॅडमिट; उजव्या डोळ्यावर आज होणार शस्त्रक्रिया

Sharad Pawar Eye Surgery : शरद पवार रुग्णालयात अ‍ॅडमिट; उजव्या डोळ्यावर आज होणार शस्त्रक्रिया

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 10, 2023 11:15 AM IST

Sharad Pawar Eye Surgery : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना डोळ्यावरील शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Sharad Pawar Health Condition
Sharad Pawar Health Condition (PTI)

Sharad Pawar Health Condition : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रात्री उशिरा शरद पवारांना रुग्णालायत अ‍ॅडमिट करण्यात आलं असून आज त्यांच्या उजव्या डोळ्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होणार आहे. गेल्या महिन्यातही त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्यानं त्यांच्या प्रकृतीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून प्रार्थना केली जात आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आठ दिवसांच्या सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पवार यांच्यावर आज ऑपरेशन करण्यात आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार असून आठ दिवस ते मुंबईतील सिल्व्हर ओकमध्ये आराम करणार आहेत. येत्या १८ जानेवारीपर्यंत ते मुंबईत असणार असल्यानं ते दृकश्राव्य माध्यमातून राष्ट्रवादीच्या बैठकांमध्ये हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ऑक्टोबर महिन्यात प्रकृती खालावल्यामुळं शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर डिसेंबरमध्येही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला असतानाही ते शिर्डीतील राष्ट्रवादीच्या महाअधिवेशनात हाताला पट्ट्या गुंडाळून कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्यामुळं आता डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतरही पवार विश्रांती घेणार की राष्ट्रवादीच्या बैठकांना हजेरी लावणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

IPL_Entry_Point