मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PFI Pune : पीएफआय आणि पुणे मनपात होता करार; भाजपनं माहिती लपवल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

PFI Pune : पीएफआय आणि पुणे मनपात होता करार; भाजपनं माहिती लपवल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 27, 2022 11:09 AM IST

PFI Pune : महापालिकेत भाजपची सत्ता असताना पालिकेनं पीएफआयशी एक करार केला होता, असा धक्कादायक खुलासा करत राष्ट्रवादीनं भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

Popular Front of India
Popular Front of India (HT)

PFI and PMC Agreement : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासह देशातील अनेक शहरांमध्ये ईडी आणि एनआयएनं पॉप्यलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर छापेमारी करत शंभरपेक्षा अधिक लोकांना अटक केली होती. पुणे शहरातही तपास यंत्रणांनी छापे मारले होते. त्यानंतर पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं. या आंदोलनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात देशविरोधी घोषणा दिल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु आता या मुद्द्यावर भाजप आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांचा फैरी रंगल्या आहेत. कारण आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, जेव्हा पुणे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता होती तेव्हा पीएफआय आणि पालिकेत एक करार करण्यात आला होता. परंतु जेव्हा ही बाब देवेंद्र फडणवीसांना लक्षात आली तेव्हा हा करार रद्द करण्यात आला, जर या संघटनेच्या कारवायांबाबत भाजपला माहिती होती, तर त्यांनी ही माहिती का लपवली?, असा सवाल प्रदीप देशमुख यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादीनं केलेल्या आरोपावरून भाजपची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

पीएफआयनं पुण्यात केलेल्या आंदोलनात आक्षेपार्ह घोषणा केल्याच्या मुद्द्यावरून पुण्याचे माजी महापौर आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीनं भाजपवर गंभीर आरोप केल्यानं यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point

विभाग