मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उद्धव ठाकरेंना धक्का.. बाळासाहेबांची सावली म्हणून वावरणारा मातोश्रीचा सेवक चंपासिंह थापा शिंदे गटात

उद्धव ठाकरेंना धक्का.. बाळासाहेबांची सावली म्हणून वावरणारा मातोश्रीचा सेवक चंपासिंह थापा शिंदे गटात

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 26, 2022 05:32 PM IST

बाळासाहेब ठाकरेंचे सहाय्यकव बाळासाहेबांची सावली म्हणून सार्वजनिक ठिकाणी वावरणाराचंपासिंह थापा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

चंपासिंह थापा शिंदे गटात
चंपासिंह थापा शिंदे गटात

मुंबई–ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासूनशिवसेनेला उतरती कळा लागली आहे.शिंदे यांना बंड करतानाच ४० आमदार आपल्यासोबत आणण्यात यश मिळवले होते. त्यानंतर राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर १२ खासदार व राज्यातील लोकप्रतिनिधीही शिंदे गटात सामील होत आहेत.

यानंतर आता बाळासाहेब ठाकरेंचे सहाय्यकव बाळासाहेबांची सावली म्हणून सार्वजनिक ठिकाणी वावरणाराचंपासिंह थापा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. बाळासाहेबांचे सर्वात विश्वासू अशी चंपासिंह थापा अशी ओळख आहे.

चंपासिंह थापा यांना बाळासाहेबांची सावली म्हटले जायचे. बाळासाहेबांच्या अतिशय जवळचे व विश्वासू व्यक्तींपैकी थापा एक होते. बाळासाहेबांच्या जेवणाच्या वेळा सांभाळणे त्यांना वेळेवर औषधे दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मीनाताईंच्या निधनानंतर बाळासाहेबांसाठी भावनिक आधार थापा हेच होते. चंपासिंह थापा मातोश्रीवर, समारंभात, दौऱ्यावेळी बाळासाहेबांसोबत कायम दिसायचे. चंपासिंह थापा यांनी जानेवारी महिन्यात मी बाळासाहेबांनंतर देखील मातोश्रीचा सेवक आहे, असे ठामपणे सांगितले. पण आता आठ महिन्यानंतर अचानक चंपासिंह थापा हे शिंदे गटात सामील होणे हे राजकीयदृष्ट्या धक्कादायक नसले तरी ठाकरे कुटुंबासाठी धक्कादायक आहे. थापामुळं मुंबईतील नेपाळी नागरिकही शिवसेनेशी जोडले गेले होते

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पार्थिवाशेजारी उभे राहून आपल्या नेत्याकडे स्तब्धपणे पाहत रहात हा सेवक त्यांना गुलाबपुष्पांच्या गुच्छाने वारा घालत उभा असल्याचे सर्वांनी पाहिले होते. जवळपास ४२ वर्षांपूर्वी नेपाळमधून आलेला आणि गोरेगावात लहान-मोठी कामे करून पोट भरणारा हा पोरगा भांडुपचा नगरसेवक के. टी. थापा याचा हात धरून ‘मातोश्री’त आला आणि त्याने स्वत:ला बाळासाहेबांना अर्पण करून टाकले. थंड पण भेदक डोळ्यांचा हा तरुण इमानदार आणि जिवाला जीव देणारा आहे, हे बाळासाहेबांच्या जाणकार नजरेने नेमके हेरले. तेव्हापासून तो बाळासाहेबांची सावली बनला.साहेबांचा दिनक्रम सांभाळणे आणि त्यांची सेवा करणे हे थापाने स्वत:चे जीवन ध्येय मानले. त्यांच्या जेवणाची, औषधाच्या वेळांची आणि दिनक्रमातील प्रत्येक बारीकसारीक बाब नेमकी लक्षात ठेवून बाळासाहेबांची जिवापाड काळजी घेणारा थापा हा अल्पावधीतच मातोश्री परिवाराचा सदस्य झाला.

नेपाळमध्ये शिवसेनेची उभारणी करण्यात थापाची भूमिका महत्त्वाची होती. बाळासाहेबांनी त्याच्यावर अपार विश्वास टाकलाच, पण आपले मनदेखील अनेकदा त्याच्याजवळ मोकळे केले. मातोश्रीवर बाळासाहेबांच्या खोली शेजारीच थापाची लहानशी खोली होती.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या