मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navi Mumbai Rape : पनवेल हादरले ! रेल्वे स्थानकात अवघ्या ३ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

Navi Mumbai Rape : पनवेल हादरले ! रेल्वे स्थानकात अवघ्या ३ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 03, 2023 09:53 AM IST

Navi Mumbai Rape case : तीन वर्षांच्या मुलीवर पनवेल रेल्वेस्थानकावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तातडीने याची दखल घेत आरोपीला अटक केली आहे.

crime news
crime news (HT_PRINT)

नवी मुंबई : पनवेल रेल्वे स्थानकांमध्ये झोपली असलेली तीन वर्षांची चिमुकली ही लघु शंकेसाठी उठली असता, तिचा गोड बोलून आडोशाला नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यावर पोलिसांनी तिचा शोध घेलता असता ती, फलाटावर बेशुद्ध अवस्थेत सापडली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार मुकेशकुमार बाबू खा असे आरोपीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३ वर्षीय मुलगी ही रात्री साडेतीन पासून बेपत्ता होती. या प्रकरणी तिच्या आईने रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेत मुलीचा शोध सुरू केला. दरम्यान, ही मुलगी बेशुद्ध अवस्थेत १ क्रमांकाच्या फलाटावर दिसली. तिच्या अवस्थेवरून तिच्यावर अत्याचार झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. यामुळे मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सीसीटीव्ही तपासन्यास सुरुवात केली. दरम्यान आरोपी हा जुईनगर रेल्वे स्टेशनवर आढळून आला. पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली. त्याला पॉलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पीडित मुलगी लघुशंकेसाठी उठली होती. त्याच वेळेस तिला गोड बोलून जवळ बोलावले होते. आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे स्थानकांमध्ये घडलेल्या या घटनेमुळे रस्त्यावरील, स्थानकांमध्ये राहणाऱ्या झोपणाऱ्या स्रिया लहान मुलींच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

IPL_Entry_Point

विभाग