मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sandeep Deshpande: मोठी बातमी! मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला

Sandeep Deshpande: मोठी बातमी! मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 03, 2023 09:38 AM IST

MNS leader Sandeep Deshpande attacked : मनसेचे माजी नगरसेवक व प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी शिवाजी पार्कमध्ये हल्ला झाला आहे.

Sandeep Deshpande
Sandeep Deshpande

Attack on MNS leader Sandeep Deshpande : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दादर भागातील माजी नगरसेवक व प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. देशपांडे हे सकाळी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञात हल्लेखोराने त्यांचावर हल्ला केला. यात ते जखमी झाल्याची माहिती मिळत असून त्यांना तातडीनं हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून हा हल्ला राजकीय वैमन्यस्यातून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

संदीप देशपांडे शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी दादर येथील शिवाजी पार्क परिसरात गेले होते. यावेळी त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. रॉड आणि स्टम्पच्या साहाय्यानं त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात संदीप देशपांडे हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीनं हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या हाताला आणि पायावर स्टम्पचा फटका बसल्यानं ते जखमी झाले आहेत.

देशपांडे यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोर हे तोंडाला मास्क लावून आले होते. त्यामुळं त्यांची ओळख पटू शकलेली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी वेगानं तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, ही घटना राजकीय वैमस्यातून झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

IPL_Entry_Point

विभाग