मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Fire : नाशिकमध्ये पुन्हा अग्निकांड, सिन्नरजवळ औषध कंपनीला आग; लाखोंचे नुकसान

Nashik Fire : नाशिकमध्ये पुन्हा अग्निकांड, सिन्नरजवळ औषध कंपनीला आग; लाखोंचे नुकसान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 24, 2023 11:20 PM IST

fire in pharmaceuticals company nashik : नाशिकमधील सिन्नरजवळील एका औषध निर्माता कंपनीत आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये लाखोंचा औषध साठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे.

नाशिकमध्ये पुन्हा अग्निकांड
नाशिकमध्ये पुन्हा अग्निकांड

नाशिकमध्ये जिंदाल कंपनीला लागलेली आगीची घटना ताजी असताना आता सिन्नर जवळील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील फार्मास्युटिकल साई टेक कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आगल्याचे बोलले जात असून या आगीत कंपनीतील लाखोंची औषधे भस्मसात झाली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील साई टेक या औषध निर्माता कंपनीत भीषण आग लागली. कंपनीतील कामगार वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले आहे. एमआयडीसीत साई टेक फार्मा यांच्या दोन कंपनी असून गोळ्या-औषधांची साठवणूक करण्यात आलेल्या कंपनीत आज आग लागली. बॉक्समध्ये ही औषधे पॅकिंग करुन ठेवण्यात आली होती. मात्र काम सुरू असतानाच आग लागली व संपूर्ण साठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

आग लागल्याचे लक्षात येताच कामगारांनी तात्काळ कंपनीबाहेर पळ काढला. सिन्नर नगरपरिषद व एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाच्या अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग