मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Nagaland Election Result Ncp Wins 7 Seats And Becomes Second Big Party Will Claim On Opposion

Nagaland Results : नागालँडमध्ये पवारांची ‘पॉवर’, ७ जागा जिंकून NCP ठरला दुसरा सर्वात मोठा पक्ष

Nagaland Results
Nagaland Results
Shrikant Ashok Londhe • HT Marathi
Mar 02, 2023 09:16 PM IST

Nagalandelectionresult : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये सात जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार असल्याचं स्पष्ट आहे.

NCP In Nagaland Election Results : पुण्यातील कसबा वचिंचवड पोटनिवडणुकीची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला चिंचवड पोटनिवडणुकीत निसटता पराभव पत्करावा लागला असला तरी शरद पवारांच्या पक्षाने ईशान्य भारतातील नागालँडमध्ये दमदार कामगिरी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँड विधानसभा निवडणुकीत सात जागांवर विजय मिळवला आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा दुसरा सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला आहे. तर, दुसरीकडे रामदास आठवले यांच्या पक्षाच्या दोन उमेदवारांचाही विजय झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नागालँडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपा-एनडीपीपी युतीने बहुमत मिळवले असून ६० जागांपैकी या आघाडीने ३७ जागा जिंकल्या आहेत. त्यापैकी २५ जागांवर एनडीपीपीला आणि १२ जागांवर भाजपला विजय मिळला आहे.

२०१८ मधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, एकाही जागांवर विजय मिळवता आला नाही. सगळ्याच जागांवर त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये सात जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार असल्याचं स्पष्ट आहे. दरम्यान ५ जागांवर पक्षाला दुसऱ्या क्रमाकांची मतं मिळाली आहेत. यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.

केंद्रात मंत्रीपद असून महाराष्ट्रात विधानसभेची एकही जागा न जिंकलेल्या आरपीआय आठवले गटानं नागालँडमध्ये करामत करताना २ जागा जिंकल्या आहेत. तसंच ४ जागांवर दोन नंबरची मतं मिळवली आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने मुंबईत हा विजय साजरा केला.

WhatsApp channel