मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nagaland Election Result : नागालँडमध्ये घडला इतिहास.. पहिल्यांदाच विधानसभेत जाणार महिला आमदार

Nagaland Election Result : नागालँडमध्ये घडला इतिहास.. पहिल्यांदाच विधानसभेत जाणार महिला आमदार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 02, 2023 06:20 PM IST

Nagalandelectionresults 2023 : नागालँड विधानसभेच्या निवडणुकीत इतिहास घडला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच विधानसभा निवडणुकीत दोन महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत.

पहिल्यांदाच विधानसभेत जाणार महिला आमदार
पहिल्यांदाच विधानसभेत जाणार महिला आमदार

ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय व नागालँड राज्यांचा विधानसभा निवडणूक निकाल आज जाहीर झाला. त्रिपुरा व नागालँडमध्ये भाजपने सत्ता राखली असून मेघालयात कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.  नागालँड विधानसभेच्या निवडणुकीत इतिहास घडला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच विधानसभा निवडणुकीत दोन महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. 

दिमापूर विधानसभा मतदारसंघातून भाजप आणि एनडीपीपी युतीचे उमेदवार हेकानी जखालू हा महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्यांनी एलजेपी (रामविलास पासवान) च्या अजितो जिमोमी यांचा १५३६ मतांनी पराभव केला. 

याचबरोबर, एनडीपीपी आणि भाजप युतीच्या आणखी एक महिला उमेदवार सलहूतुनु क्रुसे या पश्चिम अंगामी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार केनेजाखो नखरो यांचा पराभव केला. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीत केवळ चार महिला उमेदवारांना तिकीट मिळाले होते. 

नागालँडमध्ये भाजप आणि एनडीपीपी युती प्रचंड बहुमताने परतली आहे. दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजप युती ६० पैकी ३६ जागांवर आघाडीवर आहे तर दोन जागा जिंकल्या आहेत. नागालँड विधानसभेच्या ५९ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. अकुलुटो मतदारसंघातून भाजपचे उमेदवार काझेतो किनीमी बिनविरोध विजयी झाले आहेत.

IPL_Entry_Point