मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gulabrao Patil Qawwali : गुलाबराव पाटलांनी मंचावरून गायली कव्वाली; श्रोत्यांनीही दिली भरभरून दाद

Gulabrao Patil Qawwali : गुलाबराव पाटलांनी मंचावरून गायली कव्वाली; श्रोत्यांनीही दिली भरभरून दाद

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 12, 2022 10:44 AM IST

Gulabrao Patil Qawwali Video : शेरोशायरीसाठी प्रसिद्ध असलेल्या मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावात मंचावरून कव्वाली गायला सुरुवात केल्यानं उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.

Gulabrao Patil Qawwali Viral Video
Gulabrao Patil Qawwali Viral Video (HT)

Gulabrao Patil Qawwali Viral Video : धडाडीची भाषणं आणि शेरोशायरीसाठी शिंदे गटाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील हे ओळखले जातात. शिवसेनेत असताना दसरा मेळाव्यात त्यांच्या भाषणांची नेहमीच चर्चा व्हायची. शिवसेनेतून बंड केल्यानंतरही ते रांगड्या भाषणानं अनेकांचं लक्ष वेधून घेत असतात. परंतु त्यांनी जळगावातील एका कार्यक्रमात थेट मंचावरून कव्वाली गायल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 'चढता सूरज धीरे धीरे' ही कव्वाली गुलाबराव पाटलांनी गायल्यानंतर त्यांना उपस्थितांनी मोठी दाद दिली. त्याचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जळगाव जिल्ह्यातील नशिराबादमध्ये कव्वालीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही हजेरी लावली. त्यांनी मंचावरून थेट कव्वाली गायला सुरुवात केल्यानंतर सर्वांना वाटलं की एक-दोन ओळी गायल्यानंतर ते थांबतील. परंतु असं काही झालं नाही. संपूर्ण कव्वाली तोंडपाठ असल्यानं गुलाबराव पाटलांनी एकेक शब्द गाऊन दाखवला. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या आवाजाला भरभरून प्रतिसाद दिला. कव्वाली संपल्यानंतर गुलाबराव पाटलांनी 'खुदा हाफिस' म्हणत उपस्थितांना निरोप घेतला. त्यामुळं सातत्यानं भाषणांनी आणि शेरोशायरींनी चर्चेत येणारे गुलाबराव पाटील यावेळी कव्वाली गायनामुळं चर्चेत आले आहेत.

गुलाबराव पाटलांचा विजयानंतर भन्नाट डान्स...

जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटानं एकनाथ खडसेंना धक्का देत बहुमतानं सत्ता स्थापन केली आहे. दूध संघातील २० पैकी १६ जागांवर भाजप-शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. दूध संघातील दणदणीत विजयानंतर मंत्री गिरीष महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत गुलाबराव पाटलांनी भन्नाट डान्स केला होता. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

IPL_Entry_Point