मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Tuljabhawani Temple : तुळजाभवानी मंदिरात मास्कसक्ती; वाढत्या कोरोना रुग्णांमुळं प्रशासनाचा निर्णय

Tuljabhawani Temple : तुळजाभवानी मंदिरात मास्कसक्ती; वाढत्या कोरोना रुग्णांमुळं प्रशासनाचा निर्णय

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 24, 2022 08:01 AM IST

Mask Compulsory In Tuljabhawani Temple : चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं भारतासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे.

Mask Compulsory In Tuljabhawani Temple Tulajapur Osmanabad
Mask Compulsory In Tuljabhawani Temple Tulajapur Osmanabad (HT)

Mask Compulsory In Tuljabhawani Temple Tulajapur Osmanabad : गेल्या काही दिवसांपासून चीन आणि युरोपातील काही देशांमध्ये सातत्यानं कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं भारतात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी केंद्र सरकारनं राज्यांना सूचना जारी केल्या असून लोकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही कोरोनावर चर्चा झाली असून यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. परंतु आता त्याआधीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलं आहे. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

तुळजाभवानी मंदिरात महाराष्ट्रासह देशातल्या अनेक ठिकाणांहून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळं गर्दी जास्त होते. परिणामी कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी भाविक, पुजारी आणि मंदिरातील कर्मचाऱ्यांनी प्रशासनानं मास्कसक्ती केली आहे. याशिवाय मंदिर परिसरात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचंही पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तुळजाभवानी देवी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.

चीनमध्ये कोरोनाचा बीएफ-७ हा नव्या व्हेरियंटनं अनेक लोक बाधित झाले आहेत. त्यामुळं या विषाणूचा भारतात प्रसार होऊ नये यासाठी केंद्रासह अनेक राज्य सरकारांनी उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सरकारनंही मास्कसक्ती करण्याचे संकेत दिलेले असतानाच आता तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सर्वांसाठी कोरोनाची नियमावली जारी करण्यात आली आहे. येत्या ३० डिसेंबरला तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र उत्सव होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर मंदिर परिसरात मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यानंतर आता राज्यातील अनेक मंदिरात मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IPL_Entry_Point