मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik MLC Election: उमेदवार शुभांगी पाटील यांची मतदानाच्या वेळी तारांबळ, खोली क्रमांक चुकला

Nashik MLC Election: उमेदवार शुभांगी पाटील यांची मतदानाच्या वेळी तारांबळ, खोली क्रमांक चुकला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 30, 2023 01:06 PM IST

Shubhangi Patil in Nashik MLC Election : राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी मतदान सुरू आहे. सकाळी ८ वाजल्या पासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

Nashik MLC Election
Nashik MLC Election

Shubhangi Patil in Nashik MLC Election : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. अपक्ष म्हणून सत्यजित तांबे तर महाविकास आघाडी तर्फे शुभांगी पाटील या रिंगणात आहेत. आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्या शुभांगी पाटील यांनी आज मतदान केले. मात्र, त्यांचा मतदान करतांना गोंधळ उडाला. त्यांचा खोली क्रमांक चुकल्याने त्यांची तारांबळ उडाली. शुभांगी पाटील यांना चूक लक्षात येताच त्यांनी ती दुरुस्त करून मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.

राज्यात सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची चुरस सुरू असून या साठी आज मतदान होत आहे. प्रशासनाने मंतदानाची तयारी केली असून मतदान केंद्रावर बंदोबस्त ठेवला आहे. नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघासाठी हे मतदान होणार आहे. यात सर्वाधिक लक्ष हे नाशिकच्या निवडणुकीकडे लागून आहे. सत्यजित तांबे बाजी मारणार का हे दोन फेब्रुवारी रोजी कळणार आहे.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबेंच्या कुटुंबियांनी मतदान केंद्रांवर येत मतदानाचा हक्क बजावला. वडील सुधीर तांबे,आई दुर्गा आणि पत्नी मैथिलीनं मतदानाचा हक्क बजावला. मतदान सुरू झाल्यावर नाशिक मतदारसंघातील धुळे येथील मतदान केंद्रावर गोंधळ उडाला. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या मतदानासाठी गेल्यानंतर खोली क्रमांक चुकल्याचे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ दुरुस्ती करुन मतदान सुरळीत केले. दरम्यान, शुभांगी पाटील यांनी या चुकीमुळे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. "मी पदवीधर असल्याचा गर्व असून आज मतदानाचा हक्क बजावला आहे. माझे अनेक भाऊ, बहिणी पदवीधर आहेत, मी शिकलेली आहे. मी आज मतदानाचा हक्क बजावला." "मी घराबाहेर पडले, तुम्ही देखील बाहेर पडा," असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

विधानपरिषदेच्या पाच जागांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली आणि सगळ्याचं लक्ष असलेली निवडणूक म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची आहे. या ठिकाणी काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी एनवेळी अर्ज मागे घेतला. तर त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे याने अपक्ष म्हणून फॉर्म भरला. यामुळे पिता पुत्रावर कॉँग्रेसने शिस्तभंगाची कारवाई म्हणून दोघांनाही पक्षातून निलंबित केले आहे. यामुळे सत्यजित तांबे यांनी पक्षाला राम राम करत निवडणूक जिंकण्याचे ठरवले आहे. दरम्यान, ते यात यशस्वी होतात का ते २ तारखेला समजणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग