मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ranjit Patil: आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी भाजप आमदार रणजीत पाटलांविरोधात गुन्हा दाखल

Ranjit Patil: आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी भाजप आमदार रणजीत पाटलांविरोधात गुन्हा दाखल

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 30, 2023 10:15 AM IST

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजप आमदार डॉ. रणजीत पाटील यांच्याविरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ranjit Patil
Ranjit Patil

Amravati: आचारसंहिता लागू असतानाही त्यांनी काल अमरावतीच्या महेश भवनात मेळावा आयोजित केल्याने भाजप आमदार डॉ. रणजीत पाटील यांच्याविरोधात अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात रणजीत पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे.

रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने अमरावतीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यानंतर आचारसंहिता भंग केल्याच्या आरोपाखाली आमदार रणजीत राणा यांच्याविरोधात अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्,र तो मेळावा नसुन अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंची शोकसभा असल्याचं स्पष्टीकरण रणजीत पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे.

रणजीत पाटील हे गेल्या १२ वर्षांपासून अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यमंत्रिपद भुषवले होते. डॉ. रणजीत पाटील यांची स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार म्हणून ओळख असून पहिल्यांदाच त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमरावती पदवीधरमध्ये भाजपचे डॉ. रणजित पाटील आणि मविआचे उमेदवार धिरज लिंगाडे यांच्यात मुख्य लढत आहे. पदवीधर निवडणुकीच्या मतदानासाठी अमरावती विभागात 262 मतदान केंद्रे आहेत. निवडणुकीसाठी 23 उमेदवार रिंगणात आहेत.

IPL_Entry_Point