मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन भैरवनाथाचे दर्शन घेतले; माजी मंत्र्याचा आरोप

सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन भैरवनाथाचे दर्शन घेतले; माजी मंत्र्याचा आरोप

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 05, 2023 02:08 PM IST

Vijay Shivtare criticized Supriya Sule: शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Vijay Shivtare criticized Supriya Sule
Vijay Shivtare criticized Supriya Sule

Maharashtra Politics: शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावावरून राज्यातील राजकारण तापलेले असताना शिंदे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेल यांनी केला आहे. शिवतारे यांनी फेसबूकवर सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडिओ शेअर करत हा आरोप केला आहे. शिवतारे यांच्या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शिवतारे यांनी फेसबूकवर सुप्रिया सुळे यांचा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला”. शिवतारे यांच्या या फेसबूक पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

शिवतारे यांनी शेअर केलेला व्हिडिओ एका हॉटेलमधील आहे, जिथे सुप्रिया सुळे आपल्या कार्यकर्त्यांसह जेवायला गेल्या होत्या. या व्हिडिओ सुप्रिया सुळे या 'मी हीच थाळी खाल्ली' असे बोलत आहेत. याशिवाय, सुप्रिया सुळे यांनी महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचे फोटोही शिवतारे यांनी जोडले आहेत. मात्र, सुप्रिया सुळे यांचे मंदीरातील फोटो जेवणाअगोदरचे आहेत की नंतरचे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच सुप्रिया सुळे यांचीही यावर कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्या कशापद्धतीने आपली बाजू मांडतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

IPL_Entry_Point