मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उद्धव ठाकरे Facebook Live दिवशीच देणार होते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, मात्र..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
27 June 2022, 20:12 ISTShrikant Ashok Londhe
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 20:12 IST
  • ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्ह घेतलं, त्या दिवशीच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता, असं सांगितलं जात आहे.  मात्र महाआघाडीतील एका वरिष्ठ नेत्याने उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून रोखले होते.

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना मोठ्या अडचणीत सापडली आहे. शिंदे गटाने सत्ता स्थापनेचा दावा केला तर अल्पमतात असलेले ठाकरे सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. यादरम्यान उद्धव ठाकरेंबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्ह घेतलं, त्या दिवशीच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता, असं सांगितलं जात आहे. २१ किंवा २२ जून रोजीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते, असं आता समोर आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मात्र महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ही कायदेशीर प्रक्रिया नको होती, त्यामुळे ते तेव्हाच राजीनामा देणार असल्याचं बोलले जात आहे. मात्र ज्येष्ठ नेत्याच्या सल्ल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय तुर्त बदलला. उद्धव ठाकरेंना त्या दिवशी पहिल्यांदाच फेसबुक लाइव्ह घ्यायला उशिर झाला होता. या चर्चेमुळेच हा उशिर झाल्याचे आता बोलले जात आहे..

सुत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. २१ तारखेला सायंकाळी ५ वाजता फेसबुक लाईव्हच्यावेळी महाविकास आघाडीच्या एक ज्येष्ठ नेत्यामुळे राजीनामा रोखण्यात आला. पुन्हा २२ तारखेला दुपारी सचिवांची बैठक बोलावली होती. तेव्हा राजीनामा देणार होते. मात्र तेव्हा देखील महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यामुळे राजीनामा दिला नाही, अशी माहिती समोर आली आहे. शरद पवारांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखलं असंही काहीचं म्हणणं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्ता नाट्याची पवार यांनी संपूर्ण स्क्रिप्टच बदलून टाकली.