मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde ना भाजपकडून मोठी ऑफर? केंद्राच्या सत्तेतही वाटा मिळण्याची शक्यता

Eknath Shinde ना भाजपकडून मोठी ऑफर? केंद्राच्या सत्तेतही वाटा मिळण्याची शक्यता

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 23, 2022 02:02 PM IST

एकनाथ शिंदे यांच्याकडे फक्त शिवसेनेचेच नाही तर अपक्ष आमदारही असल्यानं त्यांची ताकद वाढली आहे.

एकनाथ शिंदेंना भाजपकडून मोठी ऑफर मिळाल्याची माहिती
एकनाथ शिंदेंना भाजपकडून मोठी ऑफर मिळाल्याची माहिती (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात मोठी उलथापालथ सुरू आहे. शिवसेनेचे (Shivsena) नेते, मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दोन तृतियांश आमदार आपल्या बाजुने वळवले आहेत. सध्या या सर्व आमदारांसह एकनाथ शिंदे हे गुवाहाटीत (Guwahati) आहेत. आजही त्यांच्या गटात ६ आमदार सामिल झाले आहेत. दरम्यान, आता भाजपकडून (BJP) एकनाथ शिंदे यांना ऑफर देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. यात राज्यातील मंत्रिपदांसह केंद्रातल्या सत्तेत वाटा देण्याची ऑफर असल्याचं समजते.

शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्ह करत भावनिक साद घातली. त्यानतंर एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून काही मुद्दे उपस्थित केले होते. दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते. अद्याप देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. तर भाजपने एकनाथ शिंदे यांना आपल्याकडे वळवण्याची तयारी केली असल्याचं समजते. तसंच शिंदे यांच्याकडे फक्त शिवसेनेचेच नाही तर अपक्ष आमदारही असल्यानं त्यांची ताकद वाढली आहे.

एकनाथ शिंदे हे आज राज्यपालांना वेगळ्या गटाचं पत्र देणार आहेत. यातच भाजपकडून त्यांना मोठी ऑफरही दिली गेल्याचं समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्रीपद, ८ कॅबिनेट मंत्रीपदे, ५ राज्य मंत्रीपदे देण्याची तयारी भाजपने दर्शवल्याचं म्हटलं जातंय. याशिवाय केंद्राच्या सत्तेतही वाटा दिला जाऊ शकतो. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४६ आमदार आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदेंना भाजपने दिलेल्या ऑफरबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, "शिवसेना भाजपमध्ये विलीन करण्याची अट घालून एकनाथ शिंदेना ऑफर दिलीय हे खरं आहे का?" एकनाथ शिंदेंना दिल्या जाणाऱ्या ऑफरवरून शंका व्यक्त करत प्रकाश आंबेडकर यांनीन ट्विट केलं आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या