मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 11 October 2022 Live: अमिताभ, शरद पवार, अंबानी यांनी घेतलं मुलायमसिंह यांचं अंत्यदर्शन

Mulayam Singh Yadav Funeral

Marathi News 11 october 2022 Live: अमिताभ, शरद पवार, अंबानी यांनी घेतलं मुलायमसिंह यांचं अंत्यदर्शन

01:42 AM ISTOct 12, 2022 07:12 AM Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • Share on Facebook

Marathi News Live Updates : समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांचं काल निधन झालं. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यदर्शनासाठी उत्तर प्रदेशातील सैफई इथं विविध क्षेत्रातील मान्यवरांची रीघ लागली आहे.

Tue, 11 Oct 202209:26 AM IST

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉर्डन एज्युकेशन सोसायटीचे नौरोसजी वाडिया कॉलेज सह अन्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १५  ऑक्टोबर रोजी सकाळी ९  ते दुपारी २  पर्यंत नौरोसजी वाडिया कॉलेज, टाटा असेंब्ली हॉल, वाडीया कॉलेज कॅम्पस येथे 'पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. मॉर्डन एज्युकेशन सोसायटीचे नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, टॅलेंट कॉर्प सोल्युशन व भारतरत्न मौलाना आझाद सोशल एज्युकेशन अॅण्ड स्पोर्टस असोसिएशन, पुणे यांनी या मेळावा आयोजनामध्ये सहभाग घेतला आहे. मेळाव्यासाठी पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी त्यांच्याकडे रिक्त असलेल्या ६ हजार ६४३  पदांसाठी सहभाग नोंदविला आहे. ही सर्व रिक्तपदे किमान दहावी, बारावी, कोणत्याही शाखेतील पदवी अथवा पदव्युत्तर, आयटीआय, पदविका, अभियांत्रिकी पदवी, बीसीए आदी विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी आहेत.

Tue, 11 Oct 202209:16 AM IST

Salman Khan: सलमान खान यांच्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयानं ठेवला राखून

अभिनेता सलमान खान यांना पनवेल येथील त्याचे शेजारी केतन कक्कड यांच्या विरोधात केलेल्या याचिकेवरील निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. कक्कड यांना माझ्या विरोधात सोशल मीडियात अपमानास्पद पोस्ट टाकण्यास मनाई करावी, अशी मागणी सलमाननं याचिकेद्वार केली आहे.

Tue, 11 Oct 202209:14 AM IST

नागरिकांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा या भूमिकेतून काम करावे :  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे : लोकप्रतिनिधी, प्रशासनातील उच्चपदस्थापासून शेवटच्या स्तरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपण जनतेच्या सेवेसाठीच आहोत; नागरिकांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे या भूमिकेतून काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.  पुणे महानगरपालिकेच्या ढोले रोड क्षेत्रीय कार्यालय इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेल्या राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या पुणे महसुली विभाग नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग मुख्य आयुक्त दिलीप शिंदे, राज्य सेवा हक्क आयुक्त नाशिक चित्रा कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग माजी मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

Tue, 11 Oct 202209:02 AM IST

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेले कार्य प्रेरणादायी : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे : जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेले कार्य प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. स्वारगेट येथे जनसेवा फाऊंडेशनच्यावतीने 'भेटूया दिग्गजांना' या पुस्तकाच्या प्रकाशन तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पद्मभूषण डॉ. के. एच.संचेती, प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, जनसेवाचे अध्यक्ष विनोद शहा, खजिनदार राजेश शहा, मीना शहा, जे.पी.देसाई उपस्थित होते. राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शैक्षणिक तसेच उद्योग क्षेत्रात पुण्याचे देशात नाव आहे. प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी पोषक वातावरण असलेल्या महानगरात जेष्ठ नागरिकांसाठी जनसेवा फाऊंडेशन सेवाभावाने काम करत आहे. जेष्ठांची सेवा हे अत्यंत महत्त्वाचे कार्य असून संस्था यापुढील काळातही ते सुरू ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tue, 11 Oct 202209:00 AM IST

भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक १४  ऑक्टोबरला

पुणे: जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक सभा १४  ऑक्टोबर रोजी दुपारी ३  वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावरील सभागृहात होणार आहे. नागरिकांनी त्यांचे अर्ज बैठकीच्या दिवशी दाखल करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव संजय तेली यांनी केले आहे.

Tue, 11 Oct 202208:55 AM IST

Anil Desai : शिंदे गट जे बोलतो त्यांना तेच मिळतंय, अनिल देसाईंची केंद्रावर टीका

Anil Desai On Shinde Group : शिंदे गटानं मागावं, ते त्यांना देण्याचं आधीच ठरलेलं आहे की काय?, अशी शंका मनात येत आहे. त्यांनी जी मागणी केली ती पूर्ण केली जाती आहे. संस्थांच्या विचारांचं गणित इतकं जुळतंय की हा चमत्कारिक प्रश्न प्रत्येकाचा मनात निर्माण होत असल्याचं सांगत ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंनी भाजपसह शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

Tue, 11 Oct 202208:15 AM IST

India Vs South Africa:  नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमधील तिसरा एकदिवसीय सामना होईल अशी आशा आहे. या सामन्यासाठी नाणेफेक झाली असून भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे.

Tue, 11 Oct 202208:02 AM IST

India Vs South Africa: मैदानात ओलावा असल्यामुळं नाणेफेकीला उशीर

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या व निर्णायक सामन्यावर पावसाचं सावट आहे. दुपारी एक वाजता होणारी नाणेफेक मैदानात ओलावा असल्यामुळं लांबली आहे. आता दीड वाजता मैदानाची पाहणी करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

Tue, 11 Oct 202204:32 AM IST

Stock Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स २०० हून अधिक अंकांनी खाली

शेअर बाजारात मंदीचा माहौल कायम असून कालच्या घसरणीनंतर आजही सेन्सेक्स घसरला आहे. आताच्या क्षणाला सेन्सेक्स २०० हून अधिक अंकांनी ढासळला आहे तर निफ्टी ९५ अंकांनी घसरून ट्रेड करत आहे. 

Tue, 11 Oct 202203:09 AM IST

Shinde Group Symbol : ठाकरेंनंतर शिंदे गटाला आज मिळणार नवं चिन्ह

Shinde Group Symbol : शिंदे गटाला काल निवडणूक आयोगानं 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव दिलं आहे. परंतु या गटाला अजून चिन्ह देण्यात आलेलं नाही. त्यामुळं आज निवडणूक आयोग शिंदे गटाला चिन्ह देणार आहे. यापूर्वी शिंदे गटानं तीन चिन्ह निवडणूक आयोगापुढं सादर केले होते. त्यातलाच तिसरा पर्याय म्हणजेच गदा हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात येण्याची शक्यता आहे.

Tue, 11 Oct 202203:13 AM IST

Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर डागली ७५ क्षेपणास्त्रं; आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू!

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष पुन्हा पेटला आहे. कारण आता युद्धभूमित दोन्ही देशांचे सैन्य लढत असतानाच रशियानं युक्रेनवर तब्बल ७५ क्षेपणास्त्रं डागली आहे. त्यामुळं आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.