मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 02 October Live: जम्मू कश्मीरच्या पुलवामा येथे मोठा दहशतवादी हल्ला;पोलिस जवान शहीद

जम्मू काश्मिर येथे दहशतवादी हल्ला

Marathi News 02 October Live: जम्मू कश्मीरच्या पुलवामा येथे मोठा दहशतवादी हल्ला;पोलिस जवान शहीद

02:01 AM ISTOct 03, 2022 07:31 AM Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • Share on Facebook

Marathi News Live Updates: राज्यासह देश विदेशातील ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट.

Sun, 02 Oct 202203:45 PM IST

काॕम्रेड कुमार शिराळकर यांचे निधन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते मार्क्सवादी विचारवंत काॕम्रेड कुमार शिराळकर यांचे रविवारी रात्री ८.३० वाजता डॉक्टर कराड हॉस्पिटल नाशिक येथे निधन झाले. ते २०१९ पासून कर्करोगामुळे आजारी होते. गेल्या एक महिन्यापासून पुणे, मुंबई व नाशिक येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्याचा अंत्यविधी कमरेड बीटी रणदिवे हायस्कूल, मोड, तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार येथे उद्या सोमवारी सायंकाळी ४.०० वाजता होणार आहे.

Sun, 02 Oct 202202:21 PM IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत पुणे जिल्ह्याची कामगिरी अव्वल

पुणे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०२१-२२ मध्ये झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये पुणे जिल्ह्यातील ५ शहरांनी विविध श्रेणीमध्ये अव्वल स्थान पटकावून पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम वर संपन्न झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण व शहर राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका, बारामती, लोणावळा, सासवड व  इंदापूर नागरपालिकेस विविध श्रेणीमधील पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले.

Sun, 02 Oct 202212:15 PM IST

ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शरदिनी गोळे यांचे निधन

ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शरदिनी दामोदर गोळे (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे एक मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ कथक नृत्यगुरू दिवंगत रोहिणी भाटे यांच्या त्या ज्येष्ठ शिष्या होत्या.मुंबई येथे जन्मलेल्या शरदिनी गोळे यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच नृत्याची आवड असलेल्या शरदिनी यांनी विविध गुरूंकडे नृत्याचे धडे गिरवले. पण, वयाच्या चौदाव्या वर्षी रोहिणी भाटे यांच्याकडे कथक नृत्य शिकायला सुरुवात केली. हाच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता.

Sun, 02 Oct 202211:34 AM IST

Terror attack :जम्मू कश्मीरच्या पुलवामा येथे मोठा दहशतवादी हल्ला;पोलिस जवान शहीद, सीआरपीएफचा जवान जखमी

जम्मू कश्मीरच्या पुलवामा येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका पोलिस जवानाचा मृत्यू झाला आहे. तर सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे. हा हल्ला पुलवामा येथील पिंगलाना येथे झाला आहे.

Sun, 02 Oct 202210:41 AM IST

खळबळजनक ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी; आत्मघाती हल्ल्याची गुप्तचर विभागाला माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हत्तेचा कट रचण्यात आल्याची खबलजळजनक माहिती पुढे आली आहे. शिंदे यांच्यावर आत्मघाती हल्ला करून त्यांना ठार मारण्याच्या करत रचण्यात आला होता अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. पोलिस सतर्क झाले असून या संबंधी तपास सुरू आहे.

Sun, 02 Oct 202207:44 AM IST

Sandeep Lamichhane Case: क्रिकेटपटू संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणी सरेंडर करणार

नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याने बलात्कार प्रकरणात सरेंडर करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याच्यावर १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलीस संदीपचा शोध घेत आहेत. तो नेपाळमधून पळून गेला आहे. आता आपण सरेंडर करण्यास तयार असून ६ ऑक्टोबर रोजी देशात परतणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

<p>Sandeep Lamichhane</p>
Sandeep Lamichhane

Sun, 02 Oct 202206:54 AM IST

Kalyan News : कल्याणमध्ये २६ मजली इमारतीला आग; कोणतीही जीवीतहानी नाही

Kalyan News : कल्याणमध्ये एका २६ मजली इमारतीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील खडकपाडा परिसरातील इमारतीला आग लागली असून त्यात एका वयोवृद्ध व्यक्ती लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती आहे. आग लागल्यानंतर इमारतीतील लोकांना तात्काळ बाहेक काढण्यात आलं असून या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

Sun, 02 Oct 202206:50 AM IST

Chandani Chowk Pune : पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक पुन्हा सुरू

Chandani Chowk Pune : पुण्यात वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरणारा चांदणी चौकातील पूल पाडण्यात आला आहे. त्यानंतर आता ११ तासांनंतर चांदणी चौकातील वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. पूल पाडण्यात आल्यानंतर सकाळी दोन्ही बाजूंनी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर आता वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Sun, 02 Oct 202204:06 AM IST

Mahatma Gandhi Jayanti : पीएम मोदींचं महात्मा गांधींना अभिवादन, देशवासियांना दिला मोठा संदेश

Mahatma Gandhi Jayanti 2022 : आज जगभरात महात्मा गांधींची जयंत साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन करत देशवासियांना खास संदेश दिला आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि गांधी जयंती या दोन गोष्टी देशवासियांसाठी खास असल्याचं पीएम मोदींनी म्हटलं आहे.

Sun, 02 Oct 202202:33 AM IST

Navi Mumbai : मुंबईत इमारत कोसळल्यानं एकाचा मृत्यू, मदतकार्य सुरु

Navi Mumbai : नवी मुंबईतील बोनकोडे गावात इमारत कोसळ्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत व बचावकार्य सुरू केलं आहे.

Sun, 02 Oct 202202:11 AM IST

India vs South Africa : भारत आणि द. आफ्रिकेत आज पहिला T20 सामना; गुवाहाटीत रंगणार लढत

India vs South Africa T20 : ऑस्ट्रेलियाला तीन सामन्यांच्या मालिकेत नमवल्यानंतर आता आज टिम इंडिया दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. दोन्ही संघात आज तिन सामन्याच्या मालिकेतला पहिला T20 सामना खेळला जाणार आहे. त्यामुळं T20 विश्वचषकापूर्वी तयारी करण्यासाठी भारतीय संघाला ही मोठी संधी आहे.

Sun, 02 Oct 202201:35 AM IST

Indonesia : इंडोनेशियात फुटबॉल मैदानात चेंगराचेंगरी; तब्बल १२७ लोकांचा मृत्यू!

Indonesia : इंडोनेशियाच्या पूर्व जावा प्रांतात रात्री एका फुटबॉल सामन्यावेळी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यात आतापर्यंत १२७ लोकांचा मृत्यू झाला असून १८० लोक जखमी झाले आहेत.

Sun, 02 Oct 202201:00 AM IST

Pune Bridge : चांदणी चौकातील अखेर पूल जमीनदोस्त; मलबा हटवण्याचं काम सुरू

Chandani Chowk Pune Bridge : पुण्यातील वाहतूक कोंडीसाठी कारण ठरणारा चांदणी चौकातील पूल अखेर मध्यरात्री एक वाजता पाडण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाला पाडायची तयारी सुरू होती. रात्री १२.३० नंतर चांदणी चौकालगतचा २०० मीटरचा परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. त्यानंतर पुलाला १३०० छिद्र पाडून त्यात ६०० किलो स्फोटकं भरण्यात आली होती. त्यानंतर पूल पाडण्यात आला. मध्यरात्री १.३० वाजेपासून मलबा आणि राडारोडा हटवण्याचं काम सुरू आहे.