मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  रुपी बँकेनंतर RBI चा महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला दणका; परवाना कायमस्वरुपी रद्द, सर्व शाखांना टाळे

रुपी बँकेनंतर RBI चा महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला दणका; परवाना कायमस्वरुपी रद्द, सर्व शाखांना टाळे

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 22, 2022 11:47 PM IST

रिझर्व्ह बँकेनेसोलापुरातील द लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक लि. (Laxmi Co-operative Bank) बँकेचा परवाना रद्द केला आहे. उद्यापासून (२३ सप्टेंबर) बँकेची सर्व सेवा बंद करण्यात येणार आहेत.

रुपी बँकेनंतरRBIचा महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला दणका
रुपी बँकेनंतरRBIचा महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला दणका

सोलापूर - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने(Reserve Bank Of India) दीड महिन्यापूर्वी पुण्यातील रुपी बँकेचा परवाना रद्द करत बँक अवसायनात काढली होती. आज रुपी बँकेला (Rupee Co-oprative Bank) टाळे ठोकण्यात येणार होते, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने रुपी बँकेला दिलासा देत आरबीआयच्या आदेशाला ४ आठवड्यांची स्थगिती दिली आहे. मात्र आजच आरबीआयने महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेला दणका दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिझर्व्ह बँकेने सोलापुरातील द लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक लि. (Laxmi Co-operative Bank) बँकेचा परवाना रद्द केला आहे. उद्यापासून (२३ सप्टेंबर) बँकेची सर्व सेवा बंद करण्यात येणार आहेत.  त्यामुळे खातेदारांना बँकिंग व्यवहार करता येणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज (गुरुवारी) हे परिपत्रक काढले. आरबीआयने लक्ष्मी सहकारी बँकेचा परवाना रद्द करत बँकेला कायमस्वरुपी टाळे ठोकण्याचे आदेश दिले आहेत.

बँकिंग नियमांचे पालन करण्यात बँक अपयशी ठरली असून ठेवीदारांसाठी व्यवहार सुरु ठेवण्यास बँक अनुकल नाही, असं निरीक्षण आरबीआयने नोंदवले आहे. बँकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता बँक आपल्या ठेवीदारांना पैसे परत देऊ शकणार नाही, तसेचलक्ष्मी बँकेकडे पुरेसे भांडवलदेखील उपलब्ध नसल्याचे आरबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे.

मागील काही दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नियमांचं पालन न केल्याच्या कारणावरून रूपी को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेडवर कारवाई करण्यात आली आहे. आता लक्ष्मी बॅंकेला २३ सप्टेंबरपासून टाळं लावलं जाणार आहे.

लक्ष्मी बँकेमध्ये ज्या खातेदारांचे पैसे आहेत त्यांना डिपॉझिट इन्शुरन्स अँन्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) योजने अंतर्गत पाच लाखांपर्यंतची रक्कम इन्शूअरन्स कव्हर म्हणून दिली जाणार आहे. ९९ टक्के खातेदारांना त्यांच्या सर्व ठेवी परत मिळणार आहेत. १३ सप्टेंबरपर्यंत बँकेच्या ठेवीदारांचे १९८ कोटी रुपये परत मिळाले आहेत. आरबीआयने बँकेवर केलेल्या कारवाईनंतर ग्राहकांना सर्व प्रकाराचे आर्थिक व्यवहार देखील बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्यापासून बँकेच्या सर्व शाखा बंद होणार आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग