मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Divorce Hearing : घटस्फोटाच्या सुनावणीवेळी पतीनं कोर्टातच चिरला पत्नीचा गळा; धक्कादायक घटनेनं खळबळ

Divorce Hearing : घटस्फोटाच्या सुनावणीवेळी पतीनं कोर्टातच चिरला पत्नीचा गळा; धक्कादायक घटनेनं खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 08, 2022 09:27 AM IST

Parbhani Crime News : घटस्फोटाच्या सुनावणीसाठी आलेल्या पतीनं आपल्याच पत्नीच्या गळ्यावर कटरनं वार केल्याची घटना समोर आली आहे.

Parbhani Crime News Marathi
Parbhani Crime News Marathi (HT_PRINT)

Parbhani Crime News Marathi : कुटुंबातील कलहामुळं आणि सततच्या वादामुळं घटस्फोटाच्या सुनावणीसाठी आलेल्या एका पत्नी आपल्याच पत्नीच्या गळ्यावर कटरनं वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं परभणी शहरात खळबळ उडाली असून शहर पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करायला सुरुवात केली आहे. याशिवाय जखमी महिलेला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केलं असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणीतील ज्ञानेश्वर खनपटे आणि त्यांची पत्नी वैष्णवी खनपटे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद होत असल्यानं त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. याबाबत कोर्टात कायदेशीर कारवाईदेखील सुरू झाली होती. परंतु कोर्टात सुनावणी सुरू असताना तडजोड न झाल्यानं पती ज्ञानेश्वरला प्रंचड राग आला. त्यांची पत्नी स्वच्छतागृहात जात असल्याचं पाहून आरोपी ज्ञानेश्वरनं तिच्या गळ्यावर पाठिमागून कटरनं वार केला. या हल्ल्यावेळी वैष्णवी यांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक लोकांनी मध्यस्थी करत जखमी महिलेला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. याशिवाय या घटनेची माहिती शहरातील नवा मोंढा पोलिसांनाही दिली.

त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी ज्ञानेश्वरला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जीवघेण्या हल्ल्यात पीडित वैष्णवी यांचा जीव थोडक्यात बचावला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. परभणीतील नवा मोंढा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग