मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  HSC Exam : इंग्रजीच्या पेपरमध्ये चूक; विद्यार्थ्यांना जादा गुण मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

HSC Exam : इंग्रजीच्या पेपरमध्ये चूक; विद्यार्थ्यांना जादा गुण मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 22, 2023 09:44 AM IST

HSC Exam 2023 : बारावी बोर्डाच्या इंग्रंजी पेपरमध्ये आढळून आलेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना एक्सट्रा मिळणार की नाही? हे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले.

Exam
Exam

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला कालपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर घेण्यात आला. मात्र, पेपरमध्ये प्रश्नांऐवजी चक्क उत्तर छापून आल्याने विद्यार्थी गों गोंधळून गेले. काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका कोरी सोडत या प्रश्नांची उत्तरे लिहिलीच नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून बोर्डाने विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात सरसकट ६ गुण देण्याची मागणी केली. मात्र, आता यावर बोर्डाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, मंगळवारपासून (२१ फेब्रुवारी २०२३) बारावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली. वेळापत्रकानुसार, इंग्रजीचा पहिला पेपर घेण्यात आला. इंग्रजी विषयाकरिता ८० गुणांची कृतिपत्रिका असते. त्यात प्रश्न क्रमांक ३ मध्ये १४ गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. आजच्या प्रश्नपत्रिकेत A-3, A-4, A-5 या तीन कृतींमध्ये प्रश्नांऐवजी चक्क उत्तरे छापून आली. या संभ्रमावस्थेत काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका कोरी सोडत या प्रश्नांची उत्तरे लिहिलीच नाहीत. प्रश्नपत्रिकेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.त्यामुळे बोर्डाने विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात सरसकट ६ गुण द्यावेत, अशी मागणी विद्यार्थी आणि शिक्षकांकडून करण्यात आली.

दरम्यान, बोर्डाने प्रथमदर्शनी चूक मान्य करत यावर स्पष्टीकरण दिले आहे. पण नियामकाचा अहवाल आल्यानंतर ज्यांनी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला त्यांनाच ग्रेस मार्क देण्याचा निर्णय होईल, अशी माहिती देण्यास आली आहे. इंग्रजी पेपरच्या त्रुटीवर चर्चा करण्यासाठी पुन्हा संयुक्त सभा आयोजित करण्यात येणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नाबाबत योग्य तो न्याय देण्यात येईल असे बोर्डाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये चूक होण्याचं हे काही पहिलं उदाहरण नाही, या आधीही अनेकदा बोर्डाच्या प्रशपत्रिकांमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. मात्र, यंदा पहिल्याच पेपरमध्ये अशी चूक झाल्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांसह पालकवर्गाला आश्चर्याचा धक्का लागला आहे.

IPL_Entry_Point

विभाग