मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shrirampur Crime News : मुस्लिम मुलीशी लग्न केलेला हिंदू तरुण बेपत्ता, वडिलांना घातपाताचा संशय

Shrirampur Crime News : मुस्लिम मुलीशी लग्न केलेला हिंदू तरुण बेपत्ता, वडिलांना घातपाताचा संशय

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 08, 2022 09:33 AM IST

Shrirampur Crime News : श्रीरामपूरात हिंदू तरुणानं आणि मुस्लिम तरुणीनं महिनाभरापूर्वी लग्नागाठ बांधली होती. परंतु मुलीच्या कुटुंबियांचा या लग्नाला विरोध होता.

shrirampur ahamadnagar crime news marathi
shrirampur ahamadnagar crime news marathi (HT)

shrirampur ahamadnagar crime news marathi : काही दिवसांपूर्वी एका आंतरधर्मिय लग्नाला हिंदू संघटनांनी विरोध करत लव्ह जिहाद केला जात असल्याचा आरोप केल्यानं अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये खळबळ उडाली होती. आता त्यानंतर तालुक्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिन्यापूर्वी मुस्लिम मुलीशी विवाह करणारा तरुण अचानक बेपत्ता झाला असून त्याचा घातपात करण्यात आल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर आता पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली असून बेपत्ता तरुणाची शोधमोहिम सुरु आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकं प्रकरण काय?

श्रीरामपूर तालुक्यातील भोकरमध्ये राहणारा दीपक बर्डे या तरुणाचं शहरातील एका मुस्लिम मुलीशी प्रेमसंबंध जुळले होते. मात्र त्यांच्या या नात्याला दोघांच्याही कुटुंबियांचा विरोध होता. मात्र दोघांनीही घरच्यांचा विरोध झुगारून महिनाभरापूर्वी लग्न केलं होतं. विवाह करून मुलीला घरी आणल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी दीपकला मारहाण करत मुलीला परत घरी नेलं होतं.

लग्न केल्यानंतर पत्नी तिच्या मामाच्या घरी असल्याचं कळताच दीपकनं नोकरी शोधण्यासाठी बाहेर जात असल्याचं सांगत पुणे गाठलं. परंतु तो अद्याप घरी परतलेला नाही. त्यामुळं आता त्याच्या घरच्यांच्या चिंता वाढल्या असून त्यांनी श्रीरामपूर पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली आहे. याशिवाय दीपक कुठे गेला, त्याच्यासोबत काय झालंय, सध्या तो कुठे आहे?, याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही. दीपकच्या वडिलांना त्याचा घातपात करण्यात आल्याचं संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनीही तातडीनं कारवाई करत चार संशयितांना अटक केली आहे.

हिंदू संघटनांचा पोलिसांना इशारा...

आठ दिवस उलटून गेल्यानंतरही दीपक बर्डेचा कोणताही ठावठिकाणा न लागलेला नाही. त्यामुळं त्याचा लवकरात लवकर शोध घेतला गेला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शहरातील हिंदू संघटनांनी दिला आहे. त्यामुळं आता पोलिसांनी या प्रकरणात संशयितांना अटक करून बेपत्ता तरुणाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग