सातारा: सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर ती साडे आठ महिन्याची गर्भवती राहिली. या मुलीची घरीच प्रसूती करून तीच्या नवजात बलकाचे शिर धडावेगळे करून मृतदेह नाल्यात फेकून दिले. मुलीला दवाखान्यात तपासणीसाठी नेल्यावर ही घटना उघडकीस आली. . याप्रकरणी मुलीने दिलेल्या जबाबावरून ढेबेवाडी पोलिसांनी आरोपी बापाला आणि अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणी साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढेबेवाडी विभागातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. या मुळे ८ महिने २१ दिवसांची गर्भवती राहिली. दरम्यान, या प्रकरणी गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली होती. यानंतर पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान, डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, तीच्या पोटात गर्भ नसल्याचे आढळले.
ही बाब त्यांनी पोलिसांना सांगितली. पोलिसांनी त्याबाबत मुलीकडे विचारणा केल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला. मुलीने आपली प्रसूती घरीच केल्याचे तिने सांगितले. दरम्यान, जन्मलेले बाळ रडत असल्यामुळे शेजाऱ्यांना हे समजायला नको म्हणून वडिलांनी बाळाचे तोंड दाबून घरातील धार धार शस्त्राने त्याचे शिर धडावेगळे केले. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह हा नाल्यात टाकून दिल्याचे तिने सांगितले. हे ऐकून पोलिसही हादरले.
मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित युवकावर ढेबेवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत, लैंगिक अत्याचार व अट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ढेबेवाडी पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांना देखील अटक केली आहे. संबंधित युवक व मुलीच्या वडिलांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
संबंधित बातम्या