मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Long March : किसान सभेच्या लाँग मार्चमधील शेतकऱ्याचा ठाण्यात मृत्यू
farmer death in kisan sabha long march
farmer death in kisan sabha long march

Long March : किसान सभेच्या लाँग मार्चमधील शेतकऱ्याचा ठाण्यात मृत्यू

17 March 2023, 23:40 ISTShrikant Ashok Londhe

farmer death in kisan sabha long march : नाशिक ते मुंबई पायी आलेल्या किसान सभेच्या लाँग मार्चमधील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.

Farmer Long March : नाशिक ते मुंबई पायी आलेल्या किसान सभेच्या लाँग मार्चमधील  एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. पुंडलिक जाधव असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते दिंडोरी तालुक्यातील माहुडी गावचे रहिवासी होते. जाधव यांच्या मृत्यूची वृत्त समजताच आंदोलक शेतकऱ्यांनी शहापूर येथील ग्रामीण रूग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. 

ट्रेंडिंग न्यूज

शेतकऱ्यांच्या व आदिवाशीच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढला आहे. शुक्रवारी या लाँग मार्चचा पाचवा दिवस होता. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केल्याने मोर्चा गुरुवारपासून ठाण्यातील वाशिंद येथे थांबला आहे. दरम्यान आज पुंडलिक जाधव यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. सोबतच्या शेतकऱ्यांनी त्यांना ठाण्यातील शहापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. 

आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं लाल वादळ किसान सभेच्या नेतृत्वात मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले आहे. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकाराने शेतकऱ्यांची मागण्या केल्या आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात 'वन जमिनीबद्दल सर्व निर्णयाचे अंमलबजावणीचे आदेश आम्ही दिले आहे, शेतकऱ्यांनी आपला मोर्चा मागे घ्यावा, असं आवाहन केलं आहे.

आदिवासींच्या वनजमिनीच्या दाव्याबाबत समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या समितीत माजी आमदार जीवा पांडू गावित आणि  आमदार विनोद निकोले यांचा समावेश असणार आहे. 

विभाग