मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘चंद्रकांत खैरे हा लंगडा माणूस, त्यांनी नगरपालिकेत जिंकून दाखवावं’, सत्तारांचं शिवसेनेला आव्हान

‘चंद्रकांत खैरे हा लंगडा माणूस, त्यांनी नगरपालिकेत जिंकून दाखवावं’, सत्तारांचं शिवसेनेला आव्हान

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 29, 2022 10:48 AM IST

Abdul Sattar vs Chandrakant Khaire : शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना ‘पप्पू’ म्हटल्यावरून माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या आहेत.

Abdul Sattar vs Chandrakant Khaire
Abdul Sattar vs Chandrakant Khaire (HT)

Abdul Sattar vs Chandrakant Khaire : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंचा उल्लेख 'पप्पू' असा केल्यानं राजकीय वादंग पेटलं आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे. ‘हिरवा साप आता सरडा झाल्याची’ टीका माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी सत्तारांवर टीका केली होती. त्यानंतर आता मंत्री अब्दुल सत्तारांनी चंद्रकांत खैरेंवर पटलवार केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अब्दुल सत्तारांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख पप्पू असा केल्यानंतर ‘हिरवा साप आता सरडा झाला आहे, त्याला राजकारणात गाडल्याशिवाय शांत बसणार नाही’ अशी टीका माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना कृषिमंत्री सत्तार म्हणाले की, ‘माजी खासदार चंद्रकांत खैरे हा लंगडा माणूस आहे, जे स्वत:ला गाडले गेले आहेत ते मला काय गाडणार? खैरे आता ना खासदार आणि ना आमदार, त्यांच्याकडे काय आहे? त्यांना गाडण्याचं काम नेहमी मीच केलं आहे, पुढेही करत राहणार’ असं म्हणत सत्तारांनी खैरेंवर टिकास्त्र सोडलं आहे.

‘मी हिरवा आहे की काळा, हे लोकसभा निवडणुकीतच दाखवून दिलं आहे. चंद्रकांत खैरे हा झीरो माणूस आहे. त्यांची काय चर्चा करायची?, साध्या नगरपालिकांच्या निवडणुकीतही ते निवडून येऊ शकत नाही', अशा व्यक्तींच्या टीकेला मी उत्तर देत नसल्याचंही सत्तार म्हणाले.

दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘पप्पू’ असा केल्यानं त्यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी सडकून टीका केली आहे. त्यातच आज शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची औरंगाबादेतील पैठणमध्ये सभा होणार आहे. त्यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि फलोत्पादनमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याविरोधात शिवसेनेकडून रान पेटवलं जाण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point