मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Education News : दफ्तराचे ओझे हलके होणार; पाठ्यपुस्तकालाच जोडली जाणार वह्यांची पाने

Education News : दफ्तराचे ओझे हलके होणार; पाठ्यपुस्तकालाच जोडली जाणार वह्यांची पाने

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 03, 2023 01:40 PM IST

Education News : इयत्ता तिसरी ते १० वीच्या मुलांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता राज्यातील शासनाच्या सर्व शाळातील मुलांच्या पाठ्यपुस्तकाला वह्यांची पाने जोडली जाणार आहे.

दफ्तराचे ओझे होणार कमी; पाठ्यपुस्तकाला जोडणार वह्यांची पाने
दफ्तराचे ओझे होणार कमी; पाठ्यपुस्तकाला जोडणार वह्यांची पाने

मुंबई : विद्यार्थ्यांच्या दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता इयत्ता तिसरी ते दहवीच्या विद्यार्थ्याच्या पाठ्यपुस्तकाला वह्यांची पाने जोडली जाणार आहेत. पुढील शैक्षणिक वर्षांपासून हा निर्णय घेतला जाणार आहे.

वर्गातच असतांना मुलांना शिकवतांना नोंदी करता याव्या यासाठी पाठ्यपुस्तकात वह्यांची पाने लावली जाणार आहे. पुस्तकांमध्ये असलेले पाठ, कविता झाल्यावर नोंदी घेण्याच्या हेतूने ही पाने जोडण्यात येणार आहेत. शब्दार्थ, महत्त्वाची सूत्रं, वाक्ये तसेक वर्गात शिकवण्यात येणाऱ्या गोष्टींचे टिपण काढता यावे यासाठी हे पाने दिली जाणार आहेत. या बाबचा निर्णय हा गेल्या वर्षी झाला होता. या बाबतचा शासन आदेश काढण्यात आला असून २०२३-२४ पासून या निर्णयाची अमलबजावणी करण्यात येणार आहे.

इयत्ता पहिली आणि दुसरीची पाठ्यपुस्तके देखील चार भागांमध्ये तयार करण्यात येणार आहेत. त्यानुसार गरजेनुसार सरावासाठी पृष्ठे समाविष्ट केली जाणार आहेत. शासकीय शाळांमध्ये या योजनेचा फायदा झाल्यास व त्याप्रमाणे अशा पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याची भविष्यात मागणी झाल्यास पुढील शैक्षणिक वर्षापासून वह्यांची पाने पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात येणार आहेत. कागदाच्या दरात झालेल्या वाढीमुळे पुस्तकांच्या किमतीवर त्याचा परिणाम होणार आहे. 

त्यामुळे समग्र शिक्षा योजनेअंतर्गत व खुल्या बाजारात पुरवठा होणाऱ्या सर्व पाठ्यपुस्तक मंडळाच्या मूल्यांकन सूत्रानुसार नव्याने मूल्यांकन करून त्यानुसार पुस्तकांच्या किमती निश्चित येणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग