मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane's UPSC Topper: यूपीएससीत टॉपर ठरलेल्या ठाण्याच्या लेकीची मुख्यमंत्र्यांनी थोपटली पाठ

Thane's UPSC Topper: यूपीएससीत टॉपर ठरलेल्या ठाण्याच्या लेकीची मुख्यमंत्र्यांनी थोपटली पाठ

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 24, 2023 11:13 AM IST

UPSC topper Kashmira Sankhe : ठाण्याच्या डॉ.कश्मिरा संखे हिने युपीएससी परीक्षेतील यशानंतर कुटुंबातील सदस्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी तिच्या यशाचे कौतुक करून तिची पाठ थोपाटली.

Dr Kashmira Sankhe
Dr Kashmira Sankhe

मुंबई : ठाण्याच्या डॉ.कश्मिरा संखे हिने युपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तिचा देशात २५वा क्रमांक आला आहे. राज्यात पहिला क्रमांक मिळवल्यानंतर कश्मिरा संखेने आनंद साजरा केला. तिने तिच्या कुटुंबातील सदस्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी तिला मिळालेल्या या देदीप्यमान यशाबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी तिचे अभिनंदन करित भावी कारकिर्दीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते.

ट्रेंडिंग न्यूज

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्यांचे राज्यातील यशस्वींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. या परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या डॉ. कश्मिरा संखे यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. डॉ. संखे यांच्यासह यशस्वी उमेदवारांना त्यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.'सारथी' संस्थेच्या माध्यमातून या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनीही लक्षणीय आणि घवघवीत यश मिळवले आहे, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी विशेष आनंद व्यक्त केला आहे.

शुभेच्छा देतांना शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्यासाठी अपार मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. या परीक्षेत यश मिळवणाऱ्या सर्वच यशंवत, गुणवतांचे मनापासून अभिनंदन. या सर्वांच्या यशात त्यांच्या कुटुंबियांचीही साथ महत्वाचे ठरते. म्हणूनच या यशस्वी उमेदवारांसह, त्यांच्या कुटुंबियांचेही अभिनंदन. या सर्व यशस्वींकडून प्रशासकीय सेवेच्या आपल्या माध्यमातून समाजाची ,पर्यायाने राज्य आणि देशाची सेवा घडेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.

व्यवसाय सांभाळत मिळवले यश

कश्मिरा संखे हिला लहानपणापासूनच यूपीएससी करायची आवड होती. आईने वर्तमनापत्र दाखवली, त्यातून शिकत गेले, असे कश्मिराने सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे कश्मिरा ही स्वत: एक डॉक्टर असून डेंटिस्ट आहे. तिने डॉक्टरचा व्यवसाय सांभाळून हे यश मिळवले. आरोग्य क्षेत्रात राहून देखील लोकांची सेवा करता येते पण प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत पोहचता येत असल्याचे तिने यावेळी सांगितले. राज्यात प्रथम आलेल्या कश्मिरा संखेचे आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय आहे. जिद्दीच्या जोरावर तिने तिसऱ्या प्रयत्नात प्रिलिम्स, मेन्स परीक्षेसह मुलाखतीचाही गड सर केला.

IPL_Entry_Point

विभाग