Pune Suicide News : भाजप नेत्याच्या मुलीची पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Suicide News : भाजप नेत्याच्या मुलीची पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या

Pune Suicide News : भाजप नेत्याच्या मुलीची पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या

Mar 20, 2023 10:46 AM IST

BJP Leader daughter Suicide in Pune : भारतीय जनता पक्षाचे नेते वासुदेव बट्टे आणि माजी नगरसेविका वर्षा वासुदेव बट्टे यांची कन्या सायली वासुदेव बट्टे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Pune Suicide News
Pune Suicide News

पुणे : पुण्यात एका तरुणीने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना बावधन येथे घडली आहे. आत्महत्या करणारी तरुणी ही गडचिरोलीमधील भारतीय जनता पक्षाचे नेते वासुदेव बट्टे आणि माजी नगरसेविका वर्षा वासुदेव बट्टे यांची कन्या असल्याची माहिती मिळत आहे.

सायली वासुदेव बट्टे (वय २४, रा. झाशीनगर, चंद्रपूर रस्ता, गडचिरोली) असे या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायली ही गेल्या वर्षभरापासून कामाला होती. पुण्यात एका आयटी कंपनीत ती काम करत होती. मात्र, कामाचा ताण जास्त असल्याने ती नैराश्यात होती. याच तणावातून तिने शनिवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सायली ही तिच्या भावासोबत काही दिवस राहत होती.

तिचा भाऊ हा काही दिवसांपूर्वी गडचिरोलीला परतला होता. यामुळे ती तिच्या रूमवर एकटीच राहत होती. दरम्यान, शनिवारी (दि १८) तिने तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. ती सर्वांशी बोलली. मात्र, यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर