मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : अ‍ॅट्रोसिटीची धमकी देत मागितली ६० लाखांची खंडणी; रुग्ण हक्क परिषदेच्या उमेश चव्हाणावर गुन्हा

Pune Crime : अ‍ॅट्रोसिटीची धमकी देत मागितली ६० लाखांची खंडणी; रुग्ण हक्क परिषदेच्या उमेश चव्हाणावर गुन्हा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 02, 2022 07:48 PM IST

Pune Crime news : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाला अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्याची धमकी देत तब्बल ६० कोटी रुपयांची खंडणी मागीतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे क्राइम
पुणे क्राइम (HT_PRINT)

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉस्पिटल विकत घेऊन त्यामधील औषधालय, लॅब, उपहारगृह चालविण्याच्या बदल्यात लाखो रुपये घेतले. तरुणाला ब्लॅकमेल करुन त्यांच्या मालमत्तेवर महापालिकेने कारवाई न करण्यासाठी तसेच अ‍ॅट्रोसिटीदाखल करण्याची धमकी देऊन तब्बल ६० लाख रुपयांची खंडणी मागीतल्या प्रकरणी रुग्ण हक्क परिषदेच्या उमेश चव्हाणा आणि रुग्ण हक्क परिषेदच्या अध्यक्षा अपर्णा साठे (वय ३८, रा. नारायण पेठ) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी मोहसीन नबी खान (वय ३८, रा. साईबाबानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस तक्रार दिली असून तयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ नोव्हेबर २०२१ ते २८ एप्रिल २०२२ दरम्यान घडली. उमेश चव्हाण याने फिर्यादीचे हॉस्पिटल काही दिवसांपूर्वी विकत घेतले होते चव्हाण व त्यांच्या सहकार्‍यांनी हॉस्पिटलची परवानगी नसताना वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांना बोलावून हॉस्पिटलचे उद्घाटन करत हॉस्पिटल सुरु केले.

खोट्या योजना देखील त्यांनी तयार केल्या. त्या माध्यमातून त्यांनी पैसे गोळा केले. तसेच रुग्णालयातील औषधालय, लॅब, उपहारगृह चालविण्याच्या बदल्यात लाखो रुपय घेत रुग्णालयातच बँक सुरू केली. या संदर्भात फिर्यादीने त्यांना प्रश्न विचारले असता हॉस्पिटलच्या नावावर केलेल्या ५० ते ६० लाख रुपयांच्या गैरव्यवहाराचे पैसे तुम्हीच द्या, अन्यथा तुमच्यावर अ‍ॅट्रोसिटीलावण्याची धमकी देत ६० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. यामुळे पीडित नागरिकाने थेट पोलिसांत धाव घेत या प्रकरणी तक्रार दिली आहे. तयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग