मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vidhan Sabha Session : विधानसभेत मुख्यमंत्री शिंदेंकडून लिओनोल मेस्सीचं कौतुक, म्हणाले...

Vidhan Sabha Session : विधानसभेत मुख्यमंत्री शिंदेंकडून लिओनोल मेस्सीचं कौतुक, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 20, 2022 03:56 PM IST

Eknath Shinde on Lionel Messi In Vidhan Sabha : फुटबॉल वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अर्जेंटिनानं फ्रान्सचा पराभव करत फिफा विश्वचषकावर नावं कोरलं. त्यानंतर मेस्सीनं केलेल्या कामगिरीचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केला आहे.

Eknath Shinde on Lionel Messi In Vidhan Sabha
Eknath Shinde on Lionel Messi In Vidhan Sabha (HT)

Eknath Shinde on Lionel Messi In Vidhan Sabha : फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये रोमांचक आणि तितक्याच थरारक सामन्यात लिओनोल मेस्सीच्या अर्जेंटिनानं फ्रान्सवर मात करत विजेतेपद पटकावलं आहे. त्यामुळं फायनलमध्ये मेस्सीनं बजावलेल्या कामगिरीचं जगभरात कौतुक होत असतानाच आता महाराष्ट्राच्या विधानसभेतही मेस्सीच्या कामगिरीवर चर्चा झाली आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेस्सीचं कौतुक केल्यानं त्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, परवा फुटबॉल विश्वचषकाचा सामना झाला त्यात मेस्सीनं कमाल केली. मेस्सीनं जिद्द आणि चिकाटीनं सामना जिंकत इतिहास रचला. परंतु लिओनोल मेस्सी काय एका दिवसात घडलेला नाही. त्यानं अनेक वर्ष जिद्द, चिकाटी, मेहनत, डेडिकेशन आणि डिव्होशनच्या आधारावर त्यानं यश मिळवलं. प्रत्येक व्यक्तीच्या यशमागे त्यागासह अनेक गोष्टी असतात. अशी अनेक उदाहरणं असल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिओनोल मेस्सीवर विधानसभेत स्तुतीसुमनं उधळली आहे.

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सभागृहाचं कामकाजाची माहिती घेण्यासाठी आलेल्या काही निवडक विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केलं. याशिवाय राष्ट्रकुल मंडळाच्या महाराष्ट्र शाखेनं आयोजित केलेल्या ४९ व्या संसदीय अभ्यास वर्गाचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केलं आहे. विधीमंडळातील सभागृहाचं कामकाज बरीच तास चालतं परंतु सभागृह बंद पडल्यानंतर त्याची अधिक प्रसिद्धी होत असते. त्यामुळं सभागृहात कामकाज होत असेल तर त्याबद्दलही चर्चा व्हायला हवी, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्यामुळं सध्या सभागृहाचं कामकाज सुरू असून सर्वांनी प्रक्रिया समजून घ्यायला हवी, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

IPL_Entry_Point