मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gram Ganchayat Result : येवल्यात छगन भुजबळांना धक्का, सातपैकी सहा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचा पराभव

Gram Ganchayat Result : येवल्यात छगन भुजबळांना धक्का, सातपैकी सहा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचा पराभव

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 20, 2022 03:22 PM IST

Yeola Gram Ganchayat Result : माजी मंत्री छगन भुजबळांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या येवला तालुक्यात राष्ट्रवादीला केवळ एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला आहे.

Yeola Nashik Gram Ganchayat Result
Yeola Nashik Gram Ganchayat Result (HT)

Yeola Nashik Gram Ganchayat Result : राज्यातील अनेक जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या निकालाचं चित्र आता स्पष्ट होत आहे. औरंगाबाद, जळगाव आणि अहमदनगरनंतर आता नाशिकच्या येवला तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल हाती आला आहे. त्यात येवल्यातील सातपैकी सहा ग्रामपंचायतीत माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पॅनलच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीला केवळ एका ग्रामपंचायतीत विजय मिळाला असून शिवसेनसह भाजपनं तब्बल सहा ग्रामपंचायतीत विजय मिळवत भुजबळांना मोठा राजकीय धक्का दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघ हा भुजबळांचा बालेकिल्ला मानला जातो. तालुक्यातील सात ग्रामपंचायतीत भुजबळांनी पॅनल उभं केलं होतं. त्यातील नांदेड सर गावासह दोन गावात भाजपनं तर खैरगव्हाण, कुसुर आणि चांदगावमध्ये शिवसेनेनं विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीला फक्त एरंडगाव या ग्रामपंचायतीत विजय मिळाल्यानं भुजबळांना स्वत:च्याच मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील सात तालुक्यातल्या अनेक ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून त्यात भाजपनं सर्वाधिक ग्रामपंचायतीत विजय मिळवलेला असून त्यानंतर अनुक्रमे राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गट आणि काँग्रेसनं ग्रामपंचायतीत विजय मिळवला आहे.

काही निकाल हाती आले असले तरी आणखी काही ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळं आता उर्वरित ग्रामपंचायतीतील निकालात भाजपसह राष्ट्रवादीच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. परंतु आता येवला विधानसभा मतदारसंघात भुजबळांच्या पॅनलचा सातपैकी सहा गावात पराभव झाल्यानं त्याची राज्यभरात चर्चा होत आहे.

IPL_Entry_Point